आपला जिल्हा

रेणुकानगर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न

रेणुकानगर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न
रेणुकानगर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १४ एप्रिल २०२५कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेणुका नगरचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपत विविध गीतांवरती नृत्य अविष्कार सादर केला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना सुदर्शन अंबादास बागुल या चिमुकल्याच्या आवाजात सादर करण्यात आली.

जाहिरात
छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने व शिवगर्जनेने वातावरण अति उत्साही शिवमय बनले होते
छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांच्या मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांनी दैवत छत्रपती या नृत्यविष्कार सादर केले तसेच सावित्रीबाई फुले , शेतकरी गीत त्यानंतर रेणुकामातेचे मंदिर असल्याने देवीचे गोंधळ गीत नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले.

जाहिरात
 या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व कोपरगाव तालुका गटविकास अधिकारी संदीप दळवी, तालुका गटशिक्षणाधिकारी, शबाना शेख, केंद्रप्रमुख विलास भांड, सहजानंदनगर केंद्राचे केंद्रप्रमुख  महानुभव सर, सुभाष परदेशी, जितसिंग परदेशी, समाधान पाटील, विजय सोंजे यांच्या शुभहस्ते झाले तर शामराव  त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

जाहिरात
जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, काळानुरूप शिक्षणात बदल केला आहे.या वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता १ लीच्या वर्गाचा अभ्यासक्रम सी.बी.एस.सी पॅटर्ननाने सुरु होणार आहे तरी सर्व पालकांनी विद्यार्थ्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेतच करावा असे आवाहन करत सर्व चिमुकल्याचे कौतुक केले.
 मुख्याध्यापक  सोबतसिंग राजपूत सर त्यांचे सहकारी सुखदेव जाधव, संदीप निकम, निवृत्ती घाणे, संतोषी चव्हाण, विकास वाघ, तेजेस ब्राम्हणे तसेच या कार्यक्रमासाठी शिक्षक बँकेचे संचालक शशिकांत जेजुरकर, रमेश दरेकर, महेंद्र हरकल, सुर्यभान शिंदे, पवार सर, शिंपी सर,लहरे सर तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी ,पालक ,युवक वर्ग व ग्रामस्थ उक्कडगाव या सर्वांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती तसेच उक्कडगाव ग्रामस्थांनी कार्यक्रमांचा आनंद घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ सिनगर, उपाध्यक्ष नवनाथ पवार, माजी शा. व्य. समिती अध्यक्ष सुनिल निकम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे छाया चित्रांकन करण्यासाठी पत्रकार भागीनाथ गायकवाड उपस्थित होते तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे