आपला जिल्हा

सब-ज्युनिअर हॉकी संघ राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघउप-विजेता

सब-ज्युनिअर हॉकी संघ राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघउप-विजेता

सब-ज्युनिअर हॉकी संघ राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा संघउप-विजेता

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २९ सप्टेंबर २०२५ :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी स्टेडियमपुणे येथे २५ व २६ सप्टेंबर  रोजी राज्यस्तरीय नेहरू हॉकी  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करताना गौतम पब्लिक स्कूलच्या सब ज्युनिअर हॉकी संघाने संपूर्ण स्पर्धेत नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेत खेळताना पूर्व उपांत्य सामन्यात गौतमच्या संघाने नाशिक संघाचा ३-० असा पराभव केला तर उपांत्य सामन्यात सदर संघाने अमरावती संघाचा ४-० असा दारुण पराभव केला. अंतिम सामन्यात डॉन बॉस्कोमुंबई विरुद्ध खेळतांना सदर संघाचा १-० असा निसटता पराभव झाला. गौतम पब्लिक स्कूलच्या या ग्रामीण भागातील संघाने नाशिकअमरावती अशा मातब्बर संघांचा पराभव करून उप-विजेतेपद पटकावले आहे.

जाहिरात

 राज्यस्तरावर उप-विजेतेपद मिळवणे ही बाब कौतुकास्पद असल्याचे शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी नमूद केले. गौतम पब्लिक स्कूलच्या सब-ज्युनिअर हॉकी संघास प्रशिक्षक रमेश पटारे यांनी मार्गदर्शन केले.  कर्णधार म्हणून तन्मय पाटील व उप-कर्णधार म्हणून जीवन गवारे यांनी आपली जबाबदारी चोख बजावली. स्पर्धेत तन्मय पाटील २ गोलकृष्णा सातपुते २ गोल तर ओम मुरडणर व चैतन्य नरोटे यांनी प्रत्येकी १ गोल करून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले.

जाहिरात

या स्पर्धेत शाळेच्या सब-ज्युनिअर हॉकी संघाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचे प्राचार्य नूर शेखहॉकी प्रशिक्षक रमेश पटारेक्रीडा संचालक निलकहॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढावक्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यदसंघातील सर्व खेळाडू आदींचा संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळेविश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव  चैतालीताई काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व  मान्यवरांनी शाळेचा हॉकी संघप्रशिक्षक रमेश पटारे व सर्व क्रीडा विभागाचे अभिनंदन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे