राधाकृष्ण मंदिराचा वर्धापन दिनाची जल्लोषात सांगता
राधाकृष्ण मंदिराचा वर्धापन दिनाची जल्लोषात सांगता

कोपरगाव विजय कापसे दि ३० एप्रिल २०२५– कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर नऊ चारी येथील श्री राधाकृष्ण मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनाची सांगता मोठ्या उत्साहात रुई आश्रमाचे ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली महाराज शिंदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने व उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करत रविवार दि २७ एप्रिल रोजी झाली.

लेने को हरिनाम देने को अन्नदान या म्हणीप्रमाणे मंदिराच्या सर्वेसर्वा ह.भ.प संगीता महाराज चव्हाण करंजीकर यांच्या संकल्पनेनुसार श्री राधाकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल आश्रम गंगापूर येथील श्री गुरुगाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत यांच्या रसाळ वाणीतून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम चरित्रामृत कथा दररोज संध्याकाळी ८ दिवस मोठ्या भक्ती भावाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांना दररोज महाप्रसादाचे वाटप करण्यात येत होते.

तर या पर्वकाळात सुरू असलेल्या धार्मिक सत्संग कार्यक्रमास जगद्गुरु जनार्दन स्वामी समाधी स्थान बेट कोपरगाव येथील मठाधिपती प.पु.रमेशगिरीजी महाराज,कुंभारी आश्रमाचे प.पु स्वामी राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यासह ह.भ.प दशरथ महाराज उकिरडे, ह.भ.प नवनाथ महाराज खेडकर, ह.भ.प कविताताई साबळे, ह.भ.प संगीताताई पवार, ह.भ.प कावेरीताई जेजुरकर, ह.भ.प प्रतीक्षाताई गवांदे,ह.भ.प दत्ता महाराज जेजुरकर, ह.भ.प धीरज महाराज कुर्हे,ह.भ.प योगेश महाराज फापाळे, ह.भ.प राधिकाताई फापाळे, ह.भ.प रेखाताई गायकवाड,ह.भ.प सुभाष महाराज जगताप, ह.भ.प जालिंदर महाराज शिंदे आदी संत महंत महाराजांनी भेटी देत कार्यक्रमाची शोभा वाढवली तर ठाणे येथील धर्मप्रचारक ह.भ.प एकनाथ महाराज सदगीर यांनी आपल्या कीर्तनातून धर्माची महती सांगितली तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांनी अथक परिश्रम घेतले.















