आपला जिल्हा

सत्ता भोगून कोल्हे गटाने स्वतःचा विकास केला; आ. आशुतोष काळेंनी शहराचा चेहरामोहरा बदलला- नगरसेविका निर्मला आढाव

सत्ता भोगून कोल्हे गटाने स्वतःचा विकास केला; आ. आशुतोष काळेंनी शहराचा चेहरामोहरा बदलला- नगरसेविका निर्मला आढाव

सत्ता भोगून कोल्हे गटाने स्वतःचा विकास केला; आ. आशुतोष काळेंनी शहराचा चेहरामोहरा बदलला- नगरसेविका निर्मला आढाव

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २८ फेब्रुवारी २०२६नगरपरिषदेत अनेक वर्षे सत्ता भोगूनही कोल्हे गटाने कोपरगावच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त स्वतःचाच विकास साधला आहे. त्यांच्या सत्ताकाळात कोपरगावकरांना महिन्याला एकदा पिण्याचे पाणी मिळत होते. शहराची ओळख धुळगाव अशी ओळख निर्माण झाली होती. मात्र आमदार आशुतोष काळे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणून शहराचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका निर्मला आढाव यांनी सांगितले.

जाहिरात

नगरपरिषदेच्या २०१५ च्या निवडणुकीत तुमचे ७ आणि यावेळी ११ नगरसेवक निवडून आले. नगरपरिषदेत कायम तुमचीच सत्ता राहिली. तरीही तुम्ही कोपरगावच्या नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवू शकले नाही. सत्तेत असताना केवळ विकासाच्या गप्पा मारून तुम्ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले आहे. आम्ही विरोधी पक्षात असूनही कायम जनतेच्या हितासाठी लढत आहोत आणि नागरिकांना त्रास होईल अशा प्रत्येक गोष्टीच्या विरोधात आम्ही भक्कमपणे उभे राहून आपली बाजू मांडत राहणार आहोत.

जाहिरात

आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून शहरामध्ये विकास गंगा वाहत आहे.  कोपरगावच्या जनतेची प्रामाणिक सेवा करून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा योजनेतून १३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. यासोबतच शहरात ठीकठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवून आणि गल्लीबोळातील रस्ते सिमेंटचे व डांबरी करून दळणवळणा सोबतच शहराची धुळगाव हि ओळख कायमची पुसली आहे.

जाहिरात

शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आमदार काळे यांनी शहराचे मुख्य सुशोभीकरण पूर्ण केले आहे. प्रत्येक समाजाच्या एकीकरणावर भर देण्यासाठी समाज मंदिरे आणि सभामंडप उभारले आहेत. कोपरगावची बाजारपेठ समृद्ध व्हावी या उद्देशाने व्यापारी संकुले, मॉल, व्यापारी गाळे आणि भव्य नाट्यगृह उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. नवीन शासकीय इमारतींमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली असून, सर्वांगीण विकासाचे अनेक प्रस्ताव शासन दरबारी दाखल आहेत. आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच कोपरगाव विकासाच्या दिशेने वेगाने झेपावत असल्याचा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका निर्मला आढाव यांनी व्यक्त केला आहे.

नगरसेविका निर्मला आढाव

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे