लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयास कर्मवीर पारितोषिक जाहीर
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयास कर्मवीर पारितोषिक जाहीर
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयास कर्मवीर पारितोषिक जाहीर

अहिल्यानगर विजय कापसे दि ४ मे २०२५–अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयास संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ चे सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या गौरवार्थ कर्मवीर पारितोषिक नुकतेच जाहीर झालेले आहे.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६६ व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने ९ मे २०२५ रोजी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदराव पवार साहेब यांच्या शुभहस्ते हे सर्वोच्च मानाचे पारितोषिक कर्मवीर समाधी परिसर सातारा येथे प्रदान करण्यात येणार आहे.

संस्थेतील सर्वाधिक गुणवत्ता प्राप्त विद्यालयाचे पुनर्मूल्यांकन करून दिला जाणारा हा सर्वोच्च गुणवत्तेचा मानाचा पुरस्कार आहे. हे पारितोषिक मिळण्यामागे विद्यालयातील सर्व सेवकांचे योगदान आहे. या विद्यालयात सर्व सेवकांना बरोबर घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने पूर्णपणे प्रयत्न केला जातो.

या विद्यालयाच्या गुणवत्ता विकासाच्या वाढीसाठी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे विशेष योगदान असते.तसेच कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांचे या विद्यालयावर विशेष प्रेम होते. मागील कालखंडात त्यांचे विशेष योगदान या विद्यालयास मिळालेले आहे, त्यामुळेच विद्यालयास हे पारितोषिक प्राप्त झालेले आहे. या विद्यालयाचे मार्गदर्शक रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेवराव पांडुळे, अर्जुनराव पोकळे, अभिषेक कळमकर, अंबादास गारुडकर, विश्वासराव काळे, कैलासराव मोहिते, विष्णुपंत म्हस्के, श्यामराव व्यवहारे यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया काकडे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी यांचे विशेष अभिनंदन करून कौतुक केले.



