आपला जिल्हा

इतर खर्चाला फाटा देत अनाथ आश्रमातील मुलांबरोबर केला वाढदिवस साजरा

इतर खर्चाला फाटा देत अनाथ आश्रमातील मुलांबरोबर केला वाढदिवस साजरा
इतर खर्चाला फाटा देत अनाथ आश्रमातील मुलांबरोबर केला वाढदिवस साजरा
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ मे २०२५सध्या सर्वत्रच वाढदिवस लहान थोराच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत मोठया प्रमाणावर आवाढव्य खर्च करण्याचे चित्र आपणांस पहावयास मिळत असतांना राहता येथील युवकाने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत इतर खर्चाला फाटा देत आपला वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात
सविस्तर वृत्त असे की, राहता तालुक्यातील सागर कोलते या युवकाने वाढदिवसानिमित्त इतर  खर्चाला फाटा देत शिर्डी येथील साई सावली अनाथ आश्रमातील लहान मुलांबरोबर केक कापून वाढदिवस साजरा केला.

जाहिरात
यानिमित्ताने सागर याने तेथील लहान मुलांना पावभाजी  देऊन त्यांचा दिवस गोड केला.याबद्दल तेथील सर्व शिक्षकांनी व मुलांनी त्याचे आभार मानले.यावेळी राहुल बोटे,अनिल गाढवे, बंटी गायकवाड, विशाल कापसे, देवेंद्र सातूरे, योगेश कांबळे, पत्रकार अमोल गायकवड आदी युवक उपस्थित होते.अशाच प्रकारे इतर तरुणांनी पण आपला वाढदिवस इतर खर्च न करता अनाथ आश्रमातील मुलांना अन्नदान देऊन वाढदिवस साजरा करावा असे आवाहन सागर कोलते या युवकाने केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे