अमृतवाहिनी बँकेच्या वतीने निमोन विद्यालयात विविध स्पर्धा घेत लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस साजरा
अमृतवाहिनी बँकेच्या वतीने निमोन विद्यालयात विविध स्पर्धा घेत लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस साजरा

संगमनेर विजय कापसे दि १२ फेब्रुवारी २०२५– शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण ,सकारात्मक दृष्टिकोन, प्रसंगावधान ,नवनिर्मिती, कला – कौशल्य ,खेळाडू वृत्ती, सहकार्य भावना ,संवाद कौशल्य, तसेच आत्मविश्वास या गुणांची जोपासना व्हावी. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता निर्माण व्हावी या उद्देशाने निमोण येथील हरिभाऊ सांगळे यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राज्याचे माजी महसूल मंत्री ,लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक घुलेवाडी यांचे सहकार्याने आगळावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला .

प्रसंगी बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन ॲड. ज्ञानेश्वर सांगळे हे होते . यावेळी ज्येष्ठ नेते इंजि. बी. आर. चकोर, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे, संचालक किसन सुपेकर ,भाऊसाहेब गिते ,कचरू फड , कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी तसेच अनिल बबन घुगे ,अनिल शिवाजी घुगे गोरख घुगे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे वाढदिवसानिमित्त विद्यालयात निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,हस्ताक्षर स्पर्धा ,पर्यावरण घोषवाक्य स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा तसेच क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साहवर्धक वातावरणात घेण्यात आल्या . 300 पेक्षा अधिक मुलींनी स्पर्धेत उत्साही सहभाग घेतला . स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड घुलेवाडी यांचे तर्फे स्कूल बॅग ,कंपास पेटी, रायटिंग पॅड, कलर बॉक्स ,पेन तसेच फुटबॉल, हॉलीबॉल, बॅडमिंटन व क्रिकेट साहित्य बक्षिस रूपाने देण्यात आले. विविध स्पर्धेत 130 विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकावली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. ज्ञानेश्वर सांगळे, ज्येष्ठ कार्यकर्ते इंजिनियर बी.आर.चकोर , अमृतवाहिनी सहकारी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड .नानासाहेब शिंदे आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले .सदरच्या विविध स्पर्धांमध्ये 610 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सोमनाथ गडाख यांनी केले.

याप्रसंगी बोलताना तालुक्यामध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी रचलेला पाया व आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पुढील 25 वर्ष विचारात घेऊन तालुक्याचा सर्वांगीण विकास गेल्या 40 वर्षाच्या आपल्या राजकीय कारकीर्दतून केला आहे. विविध सहकारी संस्था यांचे माध्यमातून तालुक्यामध्ये आर्थिक समृद्धी आणण्याचे काम केले आहे. विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते असे उद्गार याप्रसंगी त्यांनी केले.
आभार प्रदर्शन पर्यवेक्षक बी.आर. पिंगळे तर सूत्रसंचालन कलाशिक्षक सुनील अभियेकर व क्रीडा शिक्षक अशोक कांडेकर यांनी केले .बक्षिस यादीचे वाचन शिक्षक प्रतिनिधी बाळनाथ घुगे यांनी केले .

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साहेबराव शेळके,बाळकृष्ण चोपडे, सुदाम गोर्डे, साहेबराव गवळी ,राजेंद्र गोडगे , पोपट दिघे ,कुंडलिक मेढे ,श्रीमती समता आल्हाट, संजय जोंधळे ,बाळासाहेब मुर्तडक ,सुधीर गडाख ,श्रीमती सुनिता तोडमल ,श्रीमती वृषाली गुळवे, ज्ञानदेव कांबळे ,सुनील पवार ,याकूब तांबोळी , अबु इनामदार , संतू परबत, भगवान सांगळे, पांडुरंग मंडलिक, एकनाथ घुगे, राजेंद्र वाघ , गणपत मंडलिक, मच्छिंद्र मंडलिक, शरद शिंदे, आदींनी मौलिक परिश्रम घेतले.