आपला जिल्हा

आत्मा मालिक इंग्लिश मीडियमच सलग दुसऱ्यांदा १०० टक्के निकाल

आत्मा मालिक इंग्लिश मीडियमच सलग दुसऱ्यांदा १०० टक्के निकाल
आत्मा मालिक इंग्लिश मीडियमच सलग दुसऱ्यांदा १०० टक्के निकाल
जाहिरात

येवला विजय कापसे दि १३ मे २०२५महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर जाहीर झाला असून यात विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मलिक इंग्लिश मिडीयम गुरुकुलचा  सलग दुसऱ्यांदा  दुसऱ्या बॅचचा  १००% निकाल लागला आहे.

जाहिरात
या निकालात वेदिका योगेश आहेर ९४.४०%, समर्थ सुनील पल्हे ९३%,आयुष सचिन हेडगिरे ९१.६०%, पार्थ विजय महाजन – ९१%, साईराज संजय मढवई ९०.४०% टक्के मिळवत प्रथम पाच मध्ये येण्याचा मान पटकावला आहे.

जाहिरात
यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे प.पू. आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादासह, सर्व संत मांदियाळी, मुख्य शाखा विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट कोकमठाणचे  अध्यक्ष  नंदकुमार सुर्यवंशी, आत्मा मलिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल येवला व पुरणगाव गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे  ,  उपाध्यक्ष हेमंत शहा यासह सर्व स्थानिक व्यवस्थापक समिती सदस्य , प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे