आपला जिल्हा

श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलची उत्कृष्ट १००% निकालाची परंपरा कायम 

श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलची उत्कृष्ट १००% निकालाची परंपरा कायम 
श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलची उत्कृष्ट १००% निकालाची परंपरा कायम 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ मे २०२५महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा राज्याचा निकाल संकेतस्थळावर जाहीर झाला असून या निकालात शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलने उत्कृष्ट कामगिरी दाखवत १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे.

जाहिरात
श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम शाळेच्या  समृद्धी साईनाथ चौधरी व साक्षी संजय बोजगे या दोन विद्यार्थिनी ९३% मार्क्स मिळवत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत तर द्वितीय क्रमांक भक्ती जालिंदर काळे व तेजस्विनी खंडिझोड ९२.८०% मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाले आहे तर हर्षदा मच्छिंद्र मलिक हिने ९१.२० % मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.

जाहिरात
तसेच वेदांत रविकांत भवर  ९०.४०%, शरण्या नितीन काजळे ९०.८० %, श्रावणी पांडुरंग चिने ८९.२० %, वैष्णवी दत्तात्रय दाभाडे ८९.००% मार्क्स घेऊन पास झाले आहे तर सहा विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त टक्के घेऊन उत्तीर्ण झाले आहे तर २९ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा जास्त टक्के घेऊन उत्तीर्ण झाले आहे. तसेच १६ विद्यार्थी ७०% पेक्षा जास्त गुण घेतले आहे तर फक्त पाच विद्यार्थ्यांना ६)%  मार्क मिळवून उत्तीर्ण झाले आहे. शाळेचे यश पाहता पालकांनीही समाधान व्यक्त केले.

जाहिरात
ग्रामीण भागात कुठल्याही प्रकारचे ट्युशन नसताना शिक्षकांच्या मार्गदर्शनाने व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीने उत्कृष्ट यश मिळवले असल्याचे शाळेची संस्थापक केशवराव भवर यांनी सांगत सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
तसेच श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम चे संचालक स्वप्निल भवर व शाळेचे मुख्याध्यापक  दीपक चौधरी यांनीही सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे