आपला जिल्हाकोपरगाव नगरपालिका

नगरपालिकेच्या एम के आढाव विद्यालयात शिक्षक दिन साजरा          

नगरपालिकेच्या एम के आढाव विद्यालयात शिक्षक दिन साजरा
नगरपालिकेच्या एम के आढाव विद्यालयात शिक्षक दिन साजरा
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ६ सप्टेंबर २०२४कोपरगाव नगरलिकेच्या मा.माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जाहिरात

यावेळी विद्यालयाचा माजी विद्यार्थी राजेश किसनराव मंजुळ याने रसायनशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळविल्याबद्दल, विद्यालयातील जेष्ठ क्रीडा शिक्षक चंद्रकांत शेजवळ व तांत्रिक विभागाचे कर्मचारी अनिल वायखिंडे हे विद्यालयाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल,  शाळा क्रं ५ चे मुख्याध्यापक विलास माळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल,माजी शिक्षक प्रमोदकुमार पाटील , विनायक गायकवाड, उत्तर नगर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष विनीत वाडेकर, वसंत जाधव, चंद्रकांत शेजवळ, अनिल वायखिंडे मुख्याध्यापक भावना गवांदे आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

जाहिरात
        प्रसंगी विद्यालयातील शिक्षक जयश्री जाधव,अलका भोसले, अर्चना बोराडे, वर्षा निकुंभ, पौर्णिमा लोणारी, नितीन बोरफळकर , प्रमोद लष्करे , संदीप कर्पे ,  योगेश मोरे , संदीप शिंदे ,प्रशांत शिंदे ,अमित पराई,मारुती काटे,महेश चव्हाण ,गयाबाई नरोडे,श्रीमती बच्छाव आदी शिक्षकांचा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पेन व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.तर  मुख्याधिकारी सुहास जगताप,प्रशासनाधिकारी श्रीराम थोरात यांनी भ्रमणध्वनी द्वारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना शब्दसुमनांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमाचे प्रस्ताविक भावना गवांदे यांनी तर सूत्रसंचलन अर्चना बोराडे यांनी व आभार जाधव मॅडम यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे