आपला जिल्हा

जनतेचा विश्वास सार्थ ठरवणारा विश्वासनामा आम्ही सत्यात उतरवू -पराग संधान

जनतेचा विश्वास सार्थ ठरवणारा विश्वासनामा आम्ही सत्यात उतरवू -पराग संधान
अतिशय लोकप्रिय संकल्पना मांडणारा हा जनतेचा विश्वासनामा – स्नेहलताताई कोल्हे
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ नोव्हेंबर २०२५भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांच्या वतीने कोपरगाव नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार पराग संधान आणि सर्व प्रभागांचे उमेदवार यांच्या वतीने कलश कार्यालय येथे विश्वासनामा प्रसिद्ध करण्यात आला.यावेळी युवानेते विवेकभैय्या कोल्हे व पराग संधान यांनी आपल्या स्वप्नातल आपलं कोपरगाव कसे असावे हे अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या उपस्थीतीत हा प्रकाशन सोहळा पार पडला.

जाहिरात
पारदर्शक व जबाबदार प्रशासन,रस्ते वाहतूक,पाणी पुरवठा,कचरा व्यवस्थापन,आरोग्य आणि स्वच्छता,डिजिटल सुविधा,महिला व युवक,शिक्षण,पायाभूत सुविधा,संस्कृती आणि कला असा सर्व घटकांना न्याय देणारा विश्वासनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जाहिरात
नगरपालिका आपल्या दारी,प्रभाग वारी,लाडकी बहिण मदत कक्ष,शहराची सुकानु समिती, रोड स्विपर मशीन, सिग्नल व्यवस्था, पार्किंग,महिलांसाठी स्वच्छतागृह,रोजगार,आरोग्य सुविधेसह जेवढे पाणी तेवढे बिल ही लोकप्रिय योजना जाहीर करण्यात आली आहे.गोदावरी तिराचे सुशोभीकरण व सुविधा,नगरपालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या कुटुंबांना घरपट्टी आणि पाणी पट्टीत वीस टक्के सवलत, ज्या महिलांच्या नावावर घर असेल त्यांना घरपट्टीत पन्नास टक्के सवलत देण्याचा विचार अशा लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत आम्ही सर्व मिळून त्या सत्यात उतरवू असे संधान म्हणाले.
नागरिकांनी दिलेल्या सूचनांचा आणि अपेक्षांचा पूर्ण विचार यात करण्यात आलेला असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे