आपला जिल्हा

शालेय विद्यार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्र ताबडतोब मिळावी;कोपरगाव युवा सेना शिवसेनेची मागणी

शालेय विद्यार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्र ताबडतोब मिळावी;कोपरगाव युवा सेना शिवसेनेची मागणी

शालेय विद्यार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्र ताबडतोब मिळावी;कोपरगाव युवा सेना शिवसेनेची मागणी
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३१ मे २०२५नुकतेच दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाले असून विद्यार्थी व पालकांची सर्व शाळा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मोठी लगबग सुरू आहे.आणि या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, नॉन क्रिमिलियर, डोमासाईल आदि शासकीय कागदपत्रांची आवश्यकता असते आणि हे सर्व कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अनेक वेळा सेतू कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. त्यामुळे अनेक पालक वैतागले असून तरी आपण या कामात लक्ष देत विद्यार्थी व पालकांना ताबडतोब शैक्षणिक कामासाठी लागणारे आपल्या स्तरावरील कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना कराव्या अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्टाईलने विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा कोपरगाव युवा सेना शहर प्रमुख पै.गगनभैया हाडा यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी कोपरगावचे तहसीलदार यांना शुक्रवार दि ३० मे रोजी निवेदन देत दिला आहे.

जाहिरात

 सदर निवेदनावर कोपरगाव युवा सेना शहरप्रमुख पै.गगनभैया हाडा, वैभव शेलार, आकाश पाठक, पियुष सैंदाणे, किरण पहिले,सचिन थोरात, गौतम हाडा, राहुल गुडेकर, राहुल हाडा, विनय टाक, सोहेल पठाण, निखिल कंक्राळे, शहाबाज शहा, याकुब शेख, निसार तांबोळी, साहिल पठाण, आफताब बागवान, विशाल कांगणे,दीपेश वाघमारे, साहिल पटवेकर, समीर पटवेकर, चेतन हाडा, रितेश वाघिले, रियान शेख, आशु शेख आदींच्या सह्या आहेत.

जाहिरात
जाहिरात गौतम

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे