डाऊच बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करत महिलांचा सन्मान
डाऊच बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करत महिलांचा सन्मान
डाऊच बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करत महिलांचा सन्मान

कोपरगाव विजय कापसे दि ३१ मे २०२५– कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने कुशल प्रशासक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांनी केलेल्या कार्याचा उजाळा देत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

शनिवार दि ३१ मे रोजी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे गावचे लोकनियुक्त सरपंच दिनेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते गावातील आरोग्यसेविका सविता अंकुश गायकवाड व बचत गटाच्या मीनाक्षी विक्रम बडे या महिलांचा सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच दिनेश गायकवाड, उपसरपंच उषा ढमाले, ग्रामपंचायत सदस्य सुनील बढे, भीमराव दहे, विठाबाई माळी, पल्लवी गायकवाड, अक्षय माळी, स्वाती दहे यांच्यासह धर्मा दहे, कल्याण दहे, रावसाहेब बढे, भिकाजी दहे, केशव ढमाले, उत्तम गायकवाड, दीपक कांबळे, रोहिदास शाख, कैलास पवार, डॉ आदित्य बढे, ग्रामपंचायत अधिकारी महेश काळे, ग्रामपंचायत कर्मचारी संजय गायकवाड, ज्ञानेश्वर शाख आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







