आपला जिल्हा
वंचित बहुजन आघाडीचा संगमनेर सेवा समितीला पाठिंबा; प्रभाग ९ मध्ये सहमतीने उमेदवार
वंचित बहुजन आघाडीचा संगमनेर सेवा समितीला पाठिंबा; प्रभाग ९ मध्ये सहमतीने उमेदवार

संगमनेर प्रतिनिधी दि २२ नोव्हेंबर २०२५– समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन राजकारण विरहित स्थापन केलेली संगमनेर सेवा समिती ही राज्यघटना व समानतेचा विचार मानणारी आहे. मागील एक वर्षापासून संगमनेर शहर हे अस्वस्थ आणि असुरक्षित झाले आहे. या शहराला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी संगमनेर सेवा समिती कटिबद्ध असून या समितीच्या सर्व उमेदवारांना बहुजन विकास आघाडी जाहीर पाठिंबा देत असल्याचे बहुजन विकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.







