आपला जिल्हा

राहत्या घरात सापडले ८५ किलो जनावरांचे  मांस;शहर पोलिसांची कारवाई

राहत्या घरात सापडले ८५ किलो जनावरांचे  मांस;शहर पोलिसांची कारवाई

राहत्या घरात सापडले ८५ किलो जनावरांचे  मांस;शहर पोलिसांची कारवाई
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २ जुन २०२५-कोपरगाव शहर पोलीसांनी गेल्या अनेक दिवसापासून जनावरांची कत्तल करणाऱ्या विरुद्ध आपल्या कारवाईचा बडगा उगारला असून नुकताच कोपरगाव शहरातील संजय नगर भागात एकाच्या राहत्या घरात गोवंश जातीच्या जनावरांचे तब्बल ८५ किलो मांस मिळाले असून शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
 सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातील संजय नगर भागातील एका २४ वर्षीय अरबाज माजिद कुरेशी यांने आपल्या संजय नगर येथील राहत्या घरात बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची कत्तल करून गोवंश जनावरांचे मांस स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आला असता पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश काकडे यांच्या फिर्यादीनुसार कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये अरबाज कुरेशी याच्या विरुद्ध २७२/२०१४ बीएनएस कलम ३२५ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,९ सह मपोकाक ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन तमनर हे करत आहे.

जाहिरात
 तर आरोपी अरबाज कुरेशी याच्याकडून कोपरगाव शहर पोलिसांनी ८ हजार ५०० रुपये किमतीचे ८५ किलो मांस, १०० रुपयाचा लाकडी ठोकळा तर ३०० रुपये चा एक खराब झालेला वजन काटा असा एकूण ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जाहिरात गौतम

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे