आपला जिल्हा

शिंगणापुरात घराला आग; तब्बल ५ लाखाचे नुकसान 

शिंगणापुरात घराला आग; तब्बल ५ लाखाचे नुकसान 

शिंगणापुरात घराला आग; तब्बल ५ लाखाचे नुकसान 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ४ जुन २०२५कोपरगाव तालुक्यातील शिंगणापुर परिसरातील संजीवनी गेट येथे बुधवारी सकाळी एका घराला महावितरण कंपनीच्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून तब्बल ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने सर्वत्र हळहळ होत आहे.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, शिंगणापूर परिसरातील संजीवनी गेट येथील काकासाहेब दादाभाऊ वाघ यांच्या घराला महावितरण कंपनीच्या शॉर्ट सर्किट मुळे बुधवार दि ४ जून रोजी सकाळी ८ वाजता आग लागून घरातील मोठ्या प्रमाणात संसारपयोगी वस्तूचे अतोनात नुकसान झाले असून आग इतकी भयानक होती की घरातील सर्व वस्तू क्षणार्धात नष्ट झाल्या.

जाहिरात

 सदर घटनेची माहिती मिळताच, गावचे तलाठी यांनी प्राथमिक पंचनामा करत ३० हजार रुपयांचा सोपासेट, ६० हजार रुपयांचे कपाट, १५ हजार रुपयांचे रॅक, फ्रिज आदि गृहपयोगी वस्तू, ३ तोळे सोने, घराचे तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे आदी सुमारे ५ लाख रुपयांचे अंदाजे नुकसान झाले असल्याने स्थानिक तलाठी यांच्या पंचनाम्यानुसार स्पष्ट झाले असेल तरी सदर कुटुंबास तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

जाहिरात गौतम

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे