आपला जिल्हा

विघ्नहर्ता सिक्युरिटी सर्विसेसचे चोरी रोखण्याचे उपकरण ठरणार वरदान- व्यापारी महासंघ

विघ्नहर्ता सिक्युरिटी सर्विसेसचे चोरी रोखण्याचे उपकरण ठरणार वरदान- व्यापारी महासंघ
विघ्नहर्ता सिक्युरिटी सर्विसेसचे चोरी रोखण्याचे उपकरण ठरणार वरदान- व्यापारी महासंघ
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २६ एप्रिल २०२५दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. याच पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या वतीने सर्व व्यापाऱ्यांना “विघ्नहर्ता सिक्युरिटी सर्विसेस” चे आधुनिक सुरक्षा उपकरण आपल्या दुकानांमध्ये बसविण्याचे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी सर्व व्यापारी बांधवाना केले आहे.

जाहिरात

सविस्तर वृत्त असे की, नुकतीच कोपरगाव शहरातील सचिन वॉच या प्रसिद्ध अत्याधुनिक घड्याळाच्या दुकानावर जबरी दरोडा पडून चोरांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याने सर्व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून याच मुळे कोपरगाव येथील विघ्नहर्ता सिक्युरिटी सर्विसेस यांनी व्यापाऱ्यांना चोरी पासून दिलासा मिळावा या उद्देशाने सायरन वाजणारे एक अत्याधुनिक उपकरण बाजारात आणले असून हे उपकरण आपल्या दुकानाच्या दरवाजाला बसून घेतल्यास चोराने सदर दुकानाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यातून एक मोठा आवाज सुरू होऊन आसपासचे नागरिकाना दुकानात काहीतरी गडबड आहे हे समजू शकते त्यातून आपल्या दुकानाची चोरी होण्यापासून वाचू शकते.

जाहिरात
तसेच या उपकरणांचा उपयोग केवळ चोरी रोखण्यासाठी नव्हे, तर व्यवसाय आणि मालमत्तेची सर्वांगीण सुरक्षा करण्यासाठी होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुकानांचे संपूर्ण नियंत्रण व्यापाऱ्यांच्या हातात राहणार असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार असणारे या उपकरणाचा बसविण्याचा शुभारंभ नुकताच कोपरगाव येथील प्रसिद्ध बालाजी सुपर मार्कट मध्ये व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व कार्याध्यक्ष सुधीर डागा यांच्या शुभहस्ते बसवत करण्यात आला.

या प्रसंगी  व्यवसायाचे संरक्षण हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक व्यापाऱ्याने पुढे येऊन हे उपकरण बसवावे असे आवाहन अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी यावेळी केले.सदर चे अत्याधुनिक उपकरण आपल्याला बसवायचे असल्यास अधिक माहितीसाठी श्रद्धा कॉम्प्लेक्स धारणगाव रोड कोपरगाव या कार्यालयात अथवा ९५२७४२४७४० व ८००८७०७७३०७ या नंबर वर संपर्क साधावा.

सुरक्षा उपकरण

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे