आपला जिल्हा

काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी नितीन शिंदे यांची फेरनिवड

काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी नितीन शिंदे यांची फेरनिवड
काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी नितीन शिंदे यांची फेरनिवड
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ४ जुलै २०२५भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची प्रदेश पातळीवरील लोकसभा व विधानसभा निवडणुक दरम्यान रिक्त झालेल्या पक्ष पदाधिकारी पदाची आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवड करण्यासंदर्भात  गुरुवारी दिनांक २६ जुन २०२५ रोजी मुंबई येथील टिळक भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात ,संंदीपकुमार, ॲड. गणेश पाटील, मोहन जोशी आदींच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील संघटना बळकट करण्यासाठी रिक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली.

जाहिरात
२०१९ साली माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना नितीन मनोहर शिंदे हे कोपरगाव तालुक्याचे अध्यक्ष होते त्यांनी त्या कार्यकाळात समाजाभिमुख अनेक आंदोलन केली त्यात प्रामुख्याने तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत चालू करणे कामी, वनविभाग ऑफिस तहसील कार्यालयात स्थलांतर करण्यासाठी,तालुक्यातील रस्ते,ओला दुष्काळ अनुदान मिळण्यासाठी आंदोलन ,शेतीसाठी पाट पाणी मिळणेबाबत च्या केलेल्या या आंदोलनाची घेत त्यांची पुन्हा तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

जाहिरात
या निवडीनंतर शिंदे यांनी बोलताना सांगितले बाकी, सध्याचे केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, शेती मालाला योग्य बाजार भाव बाबतीत निर्णय घेत नसल्यामुळे शेतकरी, बेरोजगारी मुळे तरुण व कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार आणि इतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार संपूर्ण तालुका व जिल्हातील निवडणूक तयारीचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल. कोपरगाव नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यासह सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे सांगत काँग्रेस पक्षाचा इतिहास समृद्ध आहे. राहुल गांधी यांचे कार्य व विचार हे युवकांना प्रेरणा देणारे ठरत आहेत. काँग्रेसने ग्रामीण भागात विकासाच्या अनेक योजना राबवल्या, गरिबांसाठी घरे, रोजगार, तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती सारखे महत्वाचे निर्णय पुर्वी घेतलेले आहेत. त्यामुळे जनतेचा विश्वास काँग्रेसवर पुर्ण असल्याचे सांगितले.

जाहिरात गौतम
शिंदे यांचे कोपरगाव शहराध्यक्ष तुषार पोटे, विष्णु पाटील पाडेकर, विजय सुधाकर जाधव, ज्ञानेश्वर भगत, रौणक अजमेरे, ॲड. शितल देशमुख, पुष्पा भगत, शब्बीर शेख, छोटू पठाण ,सोपान धैनक, सोमनाथ पगारे, श्रीजय चांदगुडे, कैलास पंडोरे , निलेश चांदगुडे, मझर शेख, चंद्रहार जगताप,रवींद्र साबळे, राजू भाई, अब्बास पठाण ,ज्ञानेश्वर निकम, दिलीपराव औताडे ,नंदकुमार शिवरकर , सचिन होन, विलास गगे, विलास जाधव आदीनी अभिनंदन केले.

जाहिरात
नितिन शिंदे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे