आपला जिल्हा
संदीप ढाकणे यांना मंत्रालयात उपसचिव म्हणून पदोन्नती

कोपरगाव विजय कापसे दि ५ जुलै २०२५– महाराष्ट्र शासन मंत्रालयात गृह विभागात आवर सचिव म्हणून कार्यरत असलेले कोपरगाव येथील बेट भागातील रहिवाशी संदीप आसराबाई गोरखनाथ ढाकणे यांची ४ जुलै २०२५ रोजी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी प्रशांत शेलार यांच्या आदेशान्वये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या उपसचिव पदावर पदोन्नती झाल्याने कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.







