उदयपूरचे साई भक्त ६ वर्षापासून करताय शिर्डीची पायी वारी
उदयपूरचे साई भक्त ६ वर्षापासून करताय शिर्डीची पायी वारी
उदयपूरचे साई भक्त ६ वर्षापासून करताय शिर्डीची पायी वारी
कोपरगाव विजय कापसे दि २१ जुलै २०२५– सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबा समाधी येथे दर्शनासाठी जगभरातील अनेक भाविकभक्त मिळेल त्या साधनाने येत असतात तर अनेक साई भक्त पायी येऊन आपल्या श्रद्धास्थानाचे दर्शनाला येत असतात असेच राजस्थानमधील उदयपूर येथील साई भक्त शिर्डी येथे साईबाबा समाधी दर्शनासाठी एकटेच पायी जात असल्याचे समजतात कोपरगाव येथील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ परशरम साबळे यांनी त्यांचे कोपरगाव येथे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सविस्तर वृत्त असे की, राजस्थानच्या उदयपुर येथील फोटोग्राफी व्यवसायातील आर.के स्टुडिओ या नावाजलेल्या फोटो स्टुडिओचे सर्वेसर्वा तसेच विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन करणारे त्यांना स्वतःचे पायावर उभे राहण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करणाऱ्या आर के स्टुडंट हेल्पलाइन या सामाजिक संस्थेचे सर्वेसर्वा ४० वर्षीय साई भक्त मोहित पन्नालाल आचार्य हे गेल्या ६ वर्षांपासून साई बाबांच्या दर्शनासाठी येत असून या साई वरच्या श्रेद्धेचे अनेक अनुभव त्यांना आले असल्याचे सांगत गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांचा मोठ्या अपघातात जीव वाचला होता परंतु ते वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले होते असे अनेक एक ना अनेक अनुभव त्यांना आले असल्याचे त्यांनी सांगितले.

मोहित आचार्य हे कोपरगाव मधून शिर्डीला पायी जात असताना सोमवार सकाळी ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ परशरम साबळे यांनी साई बाबा तपोभूमी येथे तेथील पुजाऱ्या समवेत त्यांचा सन्मान केला तर बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेत देखील त्यांचा सन्मान केला या प्रसंगी प्राचार्य विशाल धारणगावकर,लिपिक निलेश देवकर आदी उपस्थित होते.







