गोदावरी नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
गोदावरी नदी पात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
कोपरगाव शहरातील मौंनगिरी सेतू पासून जवळच सापडला

कोपरगाव विजय कापसे दि २६ मार्च २०२५– कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात शहरातील गजानन नगर च्या जवळ एका अज्ञात पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह बुधवार दि २६ मार्च रोजी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पत्रातील पाणी साचलेल्या खड्यात आज बुधवार दि २६ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे मृतदेह आढळून आल्याच्या घटनेची माहिती कोपरगाव शहर पोलिस स्टेशनला मिळताच पोलिस उपनिरीक्षक किशोर पवार, भूषण हांडोरे, पोलिस कॉन्स्टेबल कुंढारे आणि सुशील शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करत तत्काळ पुढील तपास सुरू केला आहे.

सध्या मृत इसमाची ओळख पटवण्याचे काम व मृत्यूचे नेमके कारण काय आहे, याचा शोध कोपरगाव बशहर पोलिस घेत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये अनेक तर्क-वितर्क सुरू असून पोलिस अधिक तपास करत आहेत.





