आपला जिल्हा

प्रा. दादासाहेब कोते यांचे “फुलपाखरू” इयत्ता चौथीच्या वर्गात.

प्रा. दादासाहेब कोते यांचे “फुलपाखरू” इयत्ता चौथीच्या वर्गात.

प्रा. दादासाहेब कोते यांचे “फुलपाखरू” इयत्ता चौथीच्या वर्गात.

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १९ जुन २०२७/प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक शिर्डी स्थित प्रा. दादासाहेब कोते यांची कविता नव्या शैक्षणिक धोरणानुसार नव्याने तयार करण्यात आलेल्या अमराठी माध्यमाच्या “दोस्ती करूया मराठीशी” या मराठी विषयाच्या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे.
प्रा. दादासाहेब कोते हे लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ सेवेत होते. तसेच त्यांनी भाषा विभाग प्रमुख म्हणूनही अनेक वर्ष काम पाहिले. त्यांचे साहित्यक योगदान मोठे असून
त्यांचे “चंद्रगाणी” आणि “फुला मुलांच्या कविता” हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत.

जाहिरात

मॉडर्न मराठी पोएट्री खंड सहामध्ये त्यांच्या एका कवितेचा इंग्रजी अनुवाद अंतर्भूत करण्यात आलेला असून “शतकाची बालकविता” आणि “निवडक किशोर” या संपादित काव्य ग्रंथात यांच्या कवितांचा समावेश करण्यात आलेला आहे.

जाहिरात

यापूर्वी त्यांच्या इयत्ता पहिलीच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात “भोपळा” ही कविता तर इयत्ता दुसरी व इयत्ता तिसरीच्या सुलभ भारतीमध्ये अनुक्रमे “फुलपाखरू” आणि “झोका” या कवितांचा समावेश करण्यात आलेला होता. एका अर्थाने इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी अशा सलग चार इयत्तांमध्ये मराठीच्या पाठ्यपुस्तकात कविता समाविष्ट होण्याचा मान मिळविणारे प्रा. दादासाहेब कोते हे दुर्मिळ उदाहरण आहे. त्यांच्या या साहित्यिक यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे