आपला जिल्हा

“एक राखी जवानांसाठी ” या उपक्रमात जनता इंग्लिश स्कुल संवत्सरच्या विद्यार्थीनींनी घेतला सहभाग

“एक राखी जवानांसाठी ” या उपक्रमात जनता इंग्लिश स्कुल संवत्सरच्या विद्यार्थीनींनी घेतला सहभाग

“एक राखी जवानांसाठी ” या उपक्रमात जनता इंग्लिश स्कुल संवत्सरच्या विद्यार्थीनींनी घेतला सहभाग

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२५ : – संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या तीन -चार वर्षापासून “एक राखी जवानांसाठी ” हा उपक्रम दरवर्षी भारत देशाचे सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी राबविण्यात येत आहे.या उपक्रमाअंतर्गत शिर्डी ते जम्मु-कश्मीर पर्यंत राख्या संकलन करण्यात येत आहे,या सारखे अनेक उपक्रम राबविण्याच्या पवित्रा संजीवनी उद्योग समुह व संजीवनी युवा प्रतिष्ठानने त्यांनी हाती घेतला आहे.

जाहिरात

” एक राखी जवानांसाठी ” या उपक्रमात जनता इंग्लिश स्कुल संवत्सरच्या विद्यार्थीनींनी सहभाग घेऊन ४५० राखींचे शाळे मध्ये संकलन करून खारीचा वाटा उचलला असून संकलन केलेल्या राख्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक  ज्ञानेश्वर परजणे,  बापुसाहेब बाराहाते, संजीवनी सहकारी पतसंस्था चेअरमन  राजेंद्र परजणे, कोपरगाव, स्थानिक सल्लागार समिती ज्येष्ठ सदस्य अशोकराव लोहकने, भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष  मुकुंद मामा काळे, संवत्सर ग्रामपंचायत विद्यमान सदस्य  महेश परजणे,  अनिल शेटे,  चिमाजी दैने,  राजेंद्र नवाळे, प्रकाश बारहाते व संजीवनी कारखाना पीए विभागातील  गणेश कोताडे यांच्या उपस्थितीत सुपुर्त करण्यात आल्या.

जाहिरात

या उपक्रमास शाळचे मुख्याध्यापक रमेशजी मोरे ,पर्यवेक्षक  विजय जेजुरकर, ज्येष्ठ शिक्षक  पवन कुमार सांगळे ,  भगवान शिंदे,  विलास मोरे,  खेताडे सर,  भोये सर,  बोडरे सर, चौधरी मॅडम, नागरे मॅडम, महामुनी मॅडम, म्हस्के मॅडम, राठोड मॅडम, यांनी विद्यार्थीनींना विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  भगवान शिंदे सर यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार पवन कुमार सांगळे सर यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे