आपला जिल्हा

पतीनेच केली त्याचे कौटुंबिक वादातुन पत्नीची हत्या कोपरगाव शहर पोलीसांनी केला गुन्हा उघड.

पतीनेच केली त्याचे कौटुंबिक वादातुन पत्नीची हत्या कोपरगाव शहर पोलीसांनी केला गुन्हा उघड
पतीनेच केली त्याचे कौटुंबिक वादातुन पत्नीची हत्या कोपरगाव शहर पोलीसांनी केला गुन्हा उघड.
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १२ ऑगस्ट २०२५कोपरगाव तालुक्यातील डाउच बु.गावच्या शिवारात उंबरी नाल्याजवळ कोणीतरी अज्ञात इसमाने खुन करुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देश्याने एक अनोळखी महिलेचे प्रेत अर्धवट जाळून टाकल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती  सदर घटने बाबत पोलीस पाटील चांदेकसारे ता. कोपरगाव यांचे तक्रारीवरुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु.रजि नंबर ४१४/२०२५ भा.न्या.सं.क. १०३(१),२३८ (अ) प्रमाणे दिनांक ०८/०८/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयातील मयत अनोळखी महिला वय ४० ते ४५ वर्षे हिची ओळख पटविण्याकरीता व अज्ञात आरोपीचा शोध घेणेकरीता वरिष्ठांचे आदेशाने कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी तपास पथकाची दोन पथके तयार करुन घटना ठिकाणचे आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज चेक करणे बाबत तसेच पेट्रोलपंप वरील फुटेज चेक करणे बाबत सुचना देवुन वेगवेगळ्या दिशेने पथके रवाना करत तपास केला.

जाहिरात

तसेच महाराष्ट्रातील मिळुन न आलेल्या मिसींगची व गुन्हयातील मयत महिलांचे मिळते जुळते वर्णनाच्या व्यक्तीची वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला जावुन माहीती घेतली तसेच सीसीटीएनएस प्रणालीवर  सी.जे.एस पोर्टलवरुन मिळून न आलेल्या मिसींगची माहीती घेतली असता  कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला एक इसम निघुन गेला असले बाबत मिसींग दाखल होती. सदर मिसींगमधील व्यक्ती ही संजय हिरामण मोहीते वय ३७ वर्षे रा. सोनारवस्ती, धारणगाव ता. कोपरगाव येथील असल्याची माहितीइ मिळताच त्याची संपूर्ण माहीती प्राप्त केली असता, सदर मिसींग व्यक्ती संजय ऊर्फ बापु हिरामण मोहीते याचे दोन लग्न झालेले असल्याचे समजले असुन पहीले पत्नीचे आणि त्याचे कोर्टात वाद चालु आहेत. त्याचे पत्नीचे हातावर राहुल बापु असे गोंदलेले आहे. अशी माहीती मिळाल्याने गुन्हयातील मयत हिचे हातावर देखील राहुल बापु व स्टारचे चिन्ह असे गोंदलेले असल्याने आम्ही सदर इसमाचा मोबाईल नंबर प्राप्त करुन तांत्रीक विश्लेषणाचा आधारे नमुद इसमांचा तपास केला असता संजय हिरामण मोहीते हा शिर्डी परिसरात असल्याची माहीती प्राप्त झाली.

जाहिरात

असता शहर पोलिसांनी  शिर्डी परिसरात सदर इसमांचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना गोपनीय बातमी मिळाली की, सदर इसम हा सावळीविहीर फाट्याजवळ थांबलेला आहे. अशी माहीती मिळाल्याने सावळीविहीर फाटयावर जावुन मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री केली असता, रोडचे बाजुला एका ठिकाणी एक इसम उभा दिसला तेव्हा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्याचे जवळ जावून त्यास पकडत असतांना तो पळून जाण्याचे तयारी असतांना त्यास पकडले व त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संजय ऊर्फ बाप हिरामण मोहीते वय ३७ वर्षे रा.सोनारवस्ती, धारणगाव ता. कोपरगाव असे असल्याचे सांगितले.

जाहिरात

 सदर गुन्हयाचे अनुषंगाने त्याचेकडेस विचारपुस केली असता, त्याने सुरवातील उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता, त्याने सदर गुन्हयातील मयत अनोळखी स्त्री वय ४० ते ४५ वर्षे हि त्याची पहिली पत्नी असून तिचे नाव वनिता ऊर्फ वर्षा हिरामण हारावत (मोहीते) असे असुन तो गुमगाव, हिंगणा जि. नागपुर येथे तिचे आई वडिलांकडे राहत होती. त्यांचे कौटुंबिक वादातुन होणारे त्रासामुळे संजय हिरामण मोहीते याने ती कोपरगाव येथे आल्यानंतर तिला त्याचे एक साथीदाराचे मदतीने कोपरगाव येथुन डाऊच बु. गावचे शिवारात उंबरी नाल्याजवळ घेवुन जावुन त्या ठिकाणी तिचा गळा आवळुन तिचा खुन करुन प्रेत कोणाला ओळखु येवु नये म्हणून पुरावा नष्ट करण्याचे उद्देश्याने प्रेत अर्धवट जाळून टाकुन त्या ठिकाणवरुन पसार झाला असे सांगितले.

जाहिरात
आरोपी संजय ऊर्फ बापु हिरामण मोहीते वय ३७ वर्षे रा. सोनारवस्ती, धारणगाव ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर याने त्याचे कौटुंबिक वादातुन त्याची पहीली पत्नी वनिता ऊर्फ वर्षा हिरामण हारावत (मोहीते), रा. गुमगाव, हिंगाणा जि. नागपुर हिचा त्याचा एक साथीदार त्याचा मेव्हणा गजानन मोहीते याचे मदतीने तिचा गळा दाबुन खुन करुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने तिचे प्रेत अर्धवट जाळून टाकून सदरचा गुन्हा केलेला असल्याने आरोपीस ताब्यात घेवून त्यास सदर गुन्हयात अटक केलेली आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे, सदर गुन्हयातील पसार झालेला दुसरा आरोपी याचा शोध घेणेकामी एक पोलीस पथक रवाना केलेले आहे.
सदरची कारवाई  सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर,  शिरिष वमने  उपविभागीय पोलीस अधीकारी शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली रामकृष्ण कुंभार पोलीस निरीक्षक कोपरगाव शहर, किशोर पवार सहा. पोलीस निरीक्षक कोपरगाव शहर, दिपक रोठे पोलीस उपनिरीक्षक कोपरगाव शहर, संदिप सोन्ने पोलीस उपनिरीक्षक, पोहेकों बबन तमनर, पोहेको किशोर जाधव, पोहेकों दिपक रोकडे, पोकों गणेश काकडे, पोकों यमनाजी सुंबे, पोकों प्रविण घुले, पोकों श्रीकांत कुन्हाडे, पोहेकॉ अशोक शिंदे, स.फी. इरफान शेख नेमणुक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे