कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

कोपरगाव विजय कापसे २१ जून २०२५ –कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार दि २१ जुन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ लव्हाटे यांच्या अध्यक्षतेखाली तर मेजर कैलास थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधना यांची प्रात्यक्षिके सादर केली. योग दिनाचे महत्त्व, शरीर आणि मनावर होणारे सकारात्मक परिणाम यावर उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.

मुख्याध्यापक लव्हाटे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख पाहुणे मेजर थोरात सर यांनी शिस्त, मानसिक आरोग्य आणि योग यातील संबंध स्पष्ट करत विद्यार्थ्यांना योगासने करून दाखवली व प्रेरणादायी विचार मांडले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही उत्साहाने सहभाग घेत योगासने केली. यावेळी उपमुख्याध्यापक कोल्हे बी. के., पर्यवेक्षिका जगताप के. एफ. तसेच श्रीरामपूर चे नगरसेवक मा राजेंद्र पवार यांची विशेष उपस्थिती लाभली. एन.सी.सी. विभाग प्रमुख जाधव बी. आर. यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग लाभला.






