विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू यंग स्टार, मुंबादेवी , सातभाई व बागुल मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य सत्काराचे आयोजन

कोपरगाव विजय कापसे दि २६ एप्रिल २०२४– संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे यांच्या २७ एप्रिल रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात भव्य दिव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

कोपरगाव शहरातील न्यू यंग स्टार क्लब, मुंबादेवी तरुण मंडळ, विक्रमादित्य संजयराव सातभाई मित्र मंडळ व योगेश बागुल मित्र मंडळ यांच्या वतीने शनिवारी २७ एप्रिल रोजी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील बिरोबा चौक या ठिकाणी शनिवारी दि २७ एप्रिल रोजी ठीक सायंकाळी ७ वाजता भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून तरी मोठ्या संख्येने युवकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.