आपला जिल्हा

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पटलावर अढळ स्थान निर्माण करणारे बुद्धिबळ पटू घडवावे-आ.आशुतोष काळे

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पटलावर अढळ स्थान निर्माण करणारे बुद्धिबळ पटू घडवावे-आ.आशुतोष काळे

तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते बक्षिस वितरण

कोपरगाव विजय कापसे दि २४ सप्टेंबर २०२५भारताने गेल्या काही वर्षांत बुद्धिबळात झपाट्याने प्रगती केली आहे.  मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी.गुकेश याने जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली तर नुकत्याच जुलै महिन्यात झालेल्या महिला बुद्धीबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये नागपूरच्या दिव्या देशमुखनं फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषक आपल्या नावावर करून भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यावरून असे दिसून येते की, गेल्या काही वर्षांत बुद्धिबळात भारतीयांची आवड झपाट्यानं वाढली असून भारतीय खेळाडूंचा बुद्धिबळातील दबदबा वाढला आहे.हा दबदबा असाच टिकून ठेवण्यासाठी बुद्धिबळ स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पटलावर अढळ स्थान निर्माण करणारे बुद्धिबळपटू घडले जावेत  अशी अपेक्षा आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केली.

जाहिरात

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व छत्रपती शिवाजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव- कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षिस वितरण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी ते बोलत होते.

जाहिरात

पुढे बोलताना ते म्हणाले की, बुद्धिबळ हा एकाग्रतेने खेळण्याचा खेळ आहे. ज्यामध्ये संयमनियोजन आणि दूरदृष्टी असा सर्वांचा उत्तम असा संगम आहे. मागील काही वर्षांत बुद्धिबळात भारतीयांची आवड झपाट्यानं वाढत आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बुद्धिबळ हा खेळ अत्यंत उपयुक्त असून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाबरोबरच बुद्धिबळ खेळातही आपल्या देशाचे वर्चस्व निर्माण होत आहे हि भारतीयांसाठी अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे. यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी अशा तालुकास्तरीय स्पर्धा हे उत्तम व्यासपीठ आहे. या व्यासपिठाच्या माध्यमातून नवोदीत बुद्धिबळपटूंना मार्गदर्शक करणाऱ्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करावे जेणेकरून हे बुद्धिबळपटू देखील आपल्या चालीतून या खेळावर प्रभुत्व मिळवतील आणि जगज्जेते होतील त्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत उपयुक्त असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी यशस्वी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

स्पर्धेचे उद्घाटन रयतचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे व बेसबॉल संघटनेचे सचिव मकरंद कोऱ्हाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. हि स्पर्धा १४,१७ व १९ वर्षे मुला-मुलींच्या वयोगटात घेण्यात आल्या. या स्पर्धेत एकूण २८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. १४ वर्षे वयोगटात मुले-विंध्य वाघ,चैतन्य फडतारेप्रद्युम्न दवंगेसात्विक भागवतसुमित पगारमुली-वैभवी जाधवमृणाली सोनवणेस्वराली काळेपलाशा गायकवाडआर्या धारणगावकर व १७ वर्ष वयोगट मुले- नचिकेत काठमोरेसार्थक देशमुखसिद्धांत लाडओंकार बोगाधनेश पाटीलमुलीमध्ये स्वरा शिंदेसंस्कृती दारुंटेसमृद्धी रौंदाळेवैष्णवी हासेवृषाली टुपके तर १९ वर्षे वयोगट मुले तेजस वायादर्शन लखारेपुष्कर कुलकर्णीसार्थक कुलधरणयोशुआ गोवडामुली-कस्तुरी भोयेईश्वरी सरोदेरोहिणी पालवेप्रतीक्षा महाले आदी खेळाडूंनी यश मिळविले असून जिल्हास्तरीय स्पर्धेत हे विद्यार्थी कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्रा.प्रकाश चौरेराधाबाई काळे कन्या विद्यालयाच्या प्रा. सुशिला थोरातश्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे यांचेसह पालकविद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रयत संकुलाचे शिक्षक बाबासाहेब आभाळेविठ्ठल वसावेदेवेंद्र भोयेनितीन निकमयोगेश सावळाइब्राहिम गावितयोगेश ठाकरेअरुण दोरकेप्रसाद कापसेतालुका क्रीडा समिती सह अध्यक्ष निलेश बडजातेउपाध्यक्ष सुनील कदमसहसचिव मिलिंद कांबळेतांत्रिक पंच नितीन सोळकेसंकेत गाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व रयत संकुलाच्या सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे