आपला जिल्हा
थोरात कारखान्याचा सोमवारी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ
थोरात कारखान्याचा सोमवारी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ

संगमनेर विजय कापसे दि ४ ऑक्टोबर २०२५ सहकारासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025 – 26 या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोमवार दिनांक 06 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 10 वा. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व कांचनताई थोरात यांच्या शुभहस्ते व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सत्यजीत तांबे, ॲड.माधवराव कानवडे, डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांनी दिली आहे.






