आपला जिल्हा

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डीत आगमन

 

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डीत आगमन

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डीत आगमन

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन

 

शिर्डी विजय कापसे दि.४  ऑक्टोबर २०२५ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही श्री. शाह यांचे स्वागत केले.

जाहिरात

याप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर आगमन

शिर्डी विजय कापसे दि ४ ऑक्टोबर २०२५ – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार होते.

आगमनाप्रसंगी जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे