शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत कोपरगावचे १७ विद्यार्थी विजयी
शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत कोपरगावचे १७ विद्यार्थी विजयी
शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत कोपरगावचे १७ विद्यार्थी विजयी

कोपरगाव विजय कापसे दि १६ ऑक्टोबर २०२५–संगमनेर येथे दिनांक १० व ११ ऑक्टोबर रोजी शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या यात संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून जवळपास ४०० ते ५०० मुला – मुलींनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला.. कोपरगाव तालुक्यातील २५ मुला – मुलींनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.त्यातील १७ मुला – मुलींनी विविध वय आणि वजन गटात यश संपादन केलं.

यात प्रथम आलेले स्पर्धक अपेक्षा भगत, ऋत्वा पवार, अंश गंडे, अनुराग गवळी, श्रवण शिंदे आणि सप्तमी डहारे. द्वितीय क्रमांक आलेले स्पर्धक अर्पिता आहेर, सेजल रणवीरकर, सार्थक पंडोरे, दिव्यांशी जगताप, आदर्श भगत, सलोनी उबाळे,स्तुती त्रिभुवन, तृतीय क्रमांक आलेले स्पर्धक. तीर्था निकम, आदित्य सांगळे, हर्ष लंगोटे, आदित्य पवार. प्रथम क्रमांक आलेल्या सर्व स्पर्धकांची बारामती (पुणे )येथे होणाऱ्या शालेय विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

तर आर्यवीर कराटे हॉलवर कलर बेल्ट परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवून अनन्या पुणेकर हिने प्रथम क्रमांक मिळवत कराटे लोगो असलेला टी शर्ट बक्षीस मिळविला.तसेच कैवल्य मुरडे आणि त्रिशिका कोताडे यांनीही प्रथम क्रमांक मिळवत ट्रॉफी मिळविली.. तसेच आत्मजा घवनकुटे हिने द्वितीय , निर्भय कोताडेयाने तृतीय तर करुणा पडांगळे हिने चतुर्थ क्रमांक मिळवला.. तसेच ब्राऊन 2nd बेल्ट परीक्षेत श्रेयस पवार, तीर्थ निकम आणि वेदांत पाठक यांनीही चांगले मार्क मिळवून त्यांना बेल्ट आणि प्रमाणपत्र देण्यात आले.. यशस्वी सर्व स्पर्धकांना कराटे संस्थेचे प्रमुख प्रा. सुदर्शन पांढरे सर, वर्षा देठे मॅडम, आशुतोष भोसले सर, शुभम भोजने सर, पुष्कर बागडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.



