आपला जिल्हा

न्यू इंग्लिश स्कूल येसगाव शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल येसगाव शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल येसगाव शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २३ जानेवारी २०२६रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव मध्ये  माता-पालक संघाअंतर्गत सन २०२५-२६ चा हळदी-कुंकू कार्यक्रम सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी  अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात “विसरूनी सारी कडुता,नात्यात तीळगुळाचा गोडवा यावा” या संक्रांतीच्या संदेशाने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मा. सौ.रेणूकाताई विवेकभैय्या कोल्हे (अध्यक्षा, संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गट, कोपरगाव व मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव) उपस्थित होत्या. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर, कुटुंबातील सुसंवादावर तसेच सामाजिक बांधिलकी जपण्यावर मार्गदर्शन केले.

जाहिरात

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वर्षाताई झंवर (प्रसिद्ध निसर्गोपचार व आहारतज्ञ) यांनी उपस्थित मातापालकांना आरोग्य, संतुलित आहार, नैसर्गिक जीवनशैली याविषयी उपयुक्त व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या मनोगतातून महिलांना दैनंदिन जीवनात आरोग्य जपण्याबाबत मौलिक सूचना मिळाल्या.

जाहिरात

यावेळी अध्यक्ष निवड प्रियंका चाबुकस्वार मॅडम यांनी मांडली व त्यास अनुमोदन श्रीमती प्रमिला भालेराव मॅडम यांनी दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका  जयश्रीताई आंबरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती स्वप्नाली औताडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती नंदा बढे मॅडम यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने मातापालक उपस्थित होत्या. हळदी-कुंकू समारंभ व वाण वाटप पारंपरिक पद्धतीने पार पडले. यावेळी समाजातील गंभीर विषय लक्षात घेऊन बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा उपस्थित सर्व मातापालकांकडून घेण्यात आली. या उपक्रमास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
एकूणच संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून आयोजित केलेला हा हळदी-कुंकू कार्यक्रम सामाजिक जाणीव, सांस्कृतिक परंपरा व महिलांमधील एकोपा यांचा सुंदर संगम ठरला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे