आपला जिल्हा

कोपरगाव शहराच्या नव्या नेतृत्वाची ओळख म्हणजेच विरेन ज्ञानदेव बोरावके

कोपरगाव शहराच्या नव्या नेतृत्वाची ओळख म्हणजेच विरेन ज्ञानदेव बोरावके
सर्वगुणसंपन्न उच्च शिक्षित युवा नेतृत्व पक्षाने संधी दिल्यास शहर सर्वगुणसंपन्न करण्याचे ध्येय
कोपरगाव विजय कापसे दि २४ ऑक्टोबर २०२५तो एकनिष्ठ आहे… तो कर्तव्यनिष्ठ आहे!
२०१६ च्या नगरपालिका निवडणुकीत कोपरगावच्या जनतेने विश्वासाने निवडून दिलेले तरुण, गतिमान आणि विकासाभिमुख नेतृत्व  आपल्या प्रभागाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली, विकासकामांचा वेग वाढवला आणि प्रत्येक नागरिकाचा विश्वास संपादन केला असे सर्वगुणसंपन्न नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक उच्च शिक्षित तथा गटनेते विरेन ज्ञानदेव बोरावके हे आगामी नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ उमेदवार मानले जात आहे.
मागील नगरपालिका कार्यकाळात आमदार आशुतोष काळे यांनी दाखवलेल्या विश्वासाला साजेसे काम करत, विरेन बोरावके यांनी नगरपालिका विरोधी पक्षनेते या जबाबदारीतूनही कोपरगावच्या समस्यांवर ठाम भूमिका घेत, जनतेचा खरा आवाज बनले.
२०१६ च्या नगरपालिका निवडणुकीत विरेंन बोरावके यांना नगरसेवक म्हणून जनतेने निवडून दिल निवडून दिल्यानंतर आज पर्यंत म्हणजे तब्बल नऊ वर्ष प्रामाणिकपणे प्रभागाच्या विकासासाठी धडपडत  प्रभागांमध्ये चालण्यासाठी व्यवस्थित रस्ते तयार करत उघड्या असलेल्या गटारी बंदीस्त करत  अनेक महत्वाची कामे आमदार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करत प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
तर गेल्या काही दिवसात कोपरगाव शहराला आमदार आशुतोष काळे यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे त्या निधीमध्ये कोपरगाव शहरातील जे काही रस्ते असतील किंवा विकास कामे असतील हे नगरपालिके मार्फत प्रामाणिकपणे  कामे कशी चांगली होतील या दृष्टीने आपण एक सेवक म्हणून काम पाहणार आहे त्याचबरोबर कोपरगाव नगरपालिका मार्फत एक छान सुंदर असं शहराला उद्यान असेल व शहरासाठी एक व्हिजन घेऊन आपण या मातीतले आहोत म्हणून कोपरगाव शहरासाठी प्रामाणिकपणे विकास करणार असल्याचे मत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेले विरेंन बोरावके यांनी संगीतले आहे
आज पुन्हा एकदा —
२०२५ ची नगरपालिका निवडणूक म्हणजे “एक पाऊल पुढे” टाकण्याची वेळ. शहराचा सर्वांगीण विकास, सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व, आणि सकारात्मक बदलाचे स्वप्न विकासाच्या दिशेने… एक पाऊल पुढे हेच माझे ध्येय
विरेंन बोरावके
इच्छुक उमेदवार काळे गट

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

One Comment

Leave a Reply to Kiran Borawake Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे