आपला जिल्हा

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचा संगीत परीक्षेत शंभर टक्के निकाल

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचा संगीत परीक्षेत शंभर टक्के निकाल

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचा संगीत परीक्षेत शंभर टक्के निकाल

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २७ मार्च २०२६- कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळा’च्या संगीत परीक्षांचे आयोजन उत्साहात करण्यात आले होते. या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून संकुलाने शंभर टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.

जाहिरात

प.पु. सद्गुरू आत्मा मालिक माऊलीच्या आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष मा. नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या प्रेरणेने,  संकुलात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक व संगीत आणि वारकरी विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत विद्यार्थ्यांची सांगीतिक वाटचाल शास्त्रशुद्ध पद्धतीने घडावी, यासाठी गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या संगीत परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते.

जाहिरात

यावर्षी गायन व तबला वादन या विविध सांगीतिक स्तरांवर एकूण ५४४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व ५४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संकुलाचा निकाल अत्यंत लक्षवेधी ठरला आहे. प्राथमिक ते माध्यमिक स्तरांपर्यंतच्या सर्वच श्रेणींमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत बहुतांश विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे.

जाहिरात

दरम्यान, संकुलाच्या इतिहासात प्रथमच घडलेल्या एका उल्लेखनीय कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘मध्यमा प्रथम’ या चौथ्या स्तरावरील परीक्षेत आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलच्या तीन विद्यार्थिनींनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. यामध्ये कु. दिपाली तुळशीदास राऊत या विद्यार्थिनीने संपूर्ण देशात प्रथम श्रेणीमध्ये स्थान मिळवले, तर चैतन्या एकनाथ तुंगार व जागृती हरिदास भांगरे या विद्यार्थिनींनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या या दैदीप्यमान यशामुळे आत्मा मालिक संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, याकामी  शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकर मलिक, साईनाथ वर्पे, सांस्कृतिक विभाग व्यवस्थापक आत्मदर्शन बागडे, वसंत नारद, बाळासाहेब परजणे, शुभम कोळी, संजय सूर्यवंशी, कमलेश जाधव, स्वप्नील राऊत, निलेश काळे यांनी मेहनत घेतली आहे.

आत्मा मालिक संस्थेचे अध्यक्ष मा. नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले कि, आत्मा मालिक संकुलातील सर्व विद्यार्थ्यांनी संगीत परीक्षेत मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे. शंभर टक्के निकाल ही केवळ संख्या नसून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि संस्कारांच्या बळाचे प्रतीक आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.”यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब  उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे व प्रदीप कुमार भंडारी यांनी अभिनंदन करत पुढील शैक्षणिक व सृजनशील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे