आपला जिल्हा

लोणी बुद्रूक येथे नव्‍याने सुरु झालेले भाजीपाला लिलाव केंद्र शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल – शालीनीताई विखे पाटील

लोणी बुद्रूक येथे नव्‍याने सुरु झालेले भाजीपाला लिलाव केंद्र शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल –  शालीनीताई विखे पाटील

लोणी बुद्रूक येथे नव्‍याने सुरु झालेले भाजीपाला लिलाव केंद्र शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल – शालीनीताई विखे पाटील

जाहिरात

Loni vijay kapse दि २७ मार्च २०२६- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लोणी बुद्रूक येथे सुरू करण्यात आलेले भाजीपाला लिलाव केंद्र शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा  शालीनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जाहिरात

लोणी बुद्रूक येथील बाजार तळावर जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून बाजार समितीच्या वतीने नव्याने भाजीपाला होलसेल विक्री व्यवस्थेची सुविधा सुरू करण्यात आली. या केंद्राचा औपचारीक शुभारंभ  शालीनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आण्णासाहेब कडू, संचालक राहुल धावणे, संतोष गोर्डे, दत्‍तात्रय गोर्डे, प्रभारी सरपंच  कल्‍पना मैड, भाऊसाहेब तुकाराम विखे, दिलीप विखे, प्रविण विखे, एन.डी विखे, बाजार समितीचे सचिव सुभाष मोठे यांच्‍यासह संचालक आणि शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात

राहाता बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वतोपरी सुविधा निर्माण करू दिल्या जात आहेत. पारदर्शक कारभार, शेतकरी हिताच्या निर्णयांमुळे राहाता बाजार समितीला अहील्यानगर जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहाता आशा होलसेल केंद्राची असलेली गरज बाजार समितीने पूर्ण केल्याबद्दल सौ. विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

जाहिरात

लोणी येथे सुरू झालेले भाजीपाल्याचे होलसेल केंद्र भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने तसेच जवळील गावांना मध्यवर्ती ठरणार आहे. सकाळी उत्पादित माल होलसेल भावाने विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना फार लांब जाण्याची वेळ येणार नाही. लोणी बुद्रूक येथील बाजारतळावर मोठे शेड यासाठी उभारण्यात आले असून, मोठा परीसर उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना सुध्दा होलसेल केंद्र उपयुक्त ठरेल असा विश्वास सौ.विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे