आपला जिल्हा
२० वर्षांनी एकत्र आले करंजी विद्यालयाचे विद्यार्थी
२० वर्षांनी एकत्र आले करंजी विद्यालयाचे विद्यार्थी
२० वर्षांनी एकत्र आले करंजी विद्यालयाचे विद्यार्थी

कोपरगाव विजय कापसे दि २५ ऑक्टोबर २०२५– तब्बल २० वर्षानंतर कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २००५-०६ मधील इयत्ता १० वीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या आनंदात व उत्साहात स्नेहभोजन व महाराष्ट्रीयन परंपरातील फेटा बांधून शुक्रवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.

कर्मवीर काळे विद्यालयाचे तत्कालीन शिक्षक तथा सध्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ लव्हाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद शाळा करंजीच्या सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षिका डोखे बाई,काळे विद्यालयाचे गवनाथ मामा डोखे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी अविनाश गायकवाड, अनिल दांडगे, आशा डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक लव्हाटे यांनी आपले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर ज्येष्ठ शिक्षिका डोखे बाई व काळे विद्यालयाचे गवनाथ डोखे यांनी देखील विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत शुभेच्छा व्यक्त केल्या तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी अमृता भिंगारे यांनी तर सूत्रसंचालन व आभार गणेश फापाळे यांनी व्यक्त केले.





