आपला जिल्हा

धामोरीतील गोई नदीवरील पुलाचा अनेक दशकांपासूनचा प्रश्न कायमचा सुटल्याचे समाधान -आ.आशुतोष काळे

धामोरीतील गोई नदीवरील पुलाचा अनेक दशकांपासूनचा प्रश्न कायमचा सुटल्याचे समाधान -आ.आशुतोष काळे

धामोरी, बक्तरपूर व मंजूर परिसरात रस्ते व पुलांच्या कामांचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते लोकार्पण

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २५ ऑक्टोबर २०२५ :-कोपरगाव तालुक्याच्या धामोरी येथील गोई नदीवरील पूल हा धामोरीसह, मायगाव देवी, सांगवी भुसार, चासनळी, मोर्वीस गावातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा पूल होता. परंतु पावसाळ्यात थोडा जास्त पाऊस झाला की, हा पूल पाण्याखाली जावून जनजीवन विस्कळीत होत होते. त्यामुळे हा पूल व्हावा हि धामोरीसह, मायगाव देवी, सांगवी भुसार, चासनळी, मोर्वीस गावातील नागरिकांची मागणी होती. नागरीकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेवून या पुलासाठी निधी देवून हा पूल नागरीकांच्या सेवेत दाखल झाला व मागील अनेक दशकापासूनचा हा प्रश्न कायमचा सुटला याचे मोठे समाधान असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.

जाहिरात

            कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथे रा.मा.०७ विरेन बोरावके शेती ते शिवाजी धोदलमल घरापर्यंत रस्ता करणे, बक्तरपूर प्रजिमा ०८ ते बक्तरपूर (ग्रा.मा.०६) गावापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, धामोरी रा.मा.०७ धामोरी-मायगाव देवी-सांगवी भुसार-रवंदे-टाकळी-येसगाव महत्वाच्या रस्त्यावरील नव्याने बांधण्यात आलेला गोई नदीवरील पूल आदी विकासकामांचे लोकार्पण शनिवार (दि.२५) रोजी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

जाहिरात

ते पुढे म्हणाले की, बक्तरपूर आणि मंजूर परिसरातील रस्त्यांच्या कामामुळे या भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण भागाचा विकास हा मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया असून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने ठोस पाऊले टाकत आहोत. धामोरी गावातील गोई नदीवरील पूल हा फक्त बांधकामाचा भाग नाही, तर तो लोकांच्या आयुष्याशी जोडलेला भावनिक विषय आहे. अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची ही अपेक्षा होती. आज हा पूल पूर्ण झाल्याने गावाचा विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. कोपरगाव मतदार संघातील प्रत्येक गावात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे ध्येय असून त्यासाठी यापुढेही माझा अविरतपणे पाठपुरावा सुरूच राहील अशी ग्वाही दिली.

जाहिरात

या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक, संलग्न संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे