ओगदी येथील शेतकऱ्याच्या केळी पिकात थेट जिल्हाधिकाऱ्यांची भरपावसात भेट
ओगदी येथील शेतकऱ्याच्या केळी पिकात थेट जिल्हाधिकाऱ्यांची भरपावसात भेट
शेतकरी कोल्हे कुटुंब गेले भारावुन

कोपरगाव विजय कापसे दि २९ ऑक्टोबर २०२५– अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया बुधवार दि २९ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयास भेटी दिल्या याच भेटीत त्यांनी तालुक्यातील ओगदी येथील राहुल विष्णू कोल्हे या युवा शेतकऱ्यांने आपल्या शेतात फुलावलेल्या केळी पिकास जिल्हाधिकारी डॉ आशिया यांनी भर पावसात केळीच्या बागेत भेट देत माहिती घेतली. याप्रसंगी थेट जिल्हाधिकारी आपल्या शेतात आल्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा झाला होता.

या प्रसंगी त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, मंडळ कृषी अधिकारी साईनाथ मलिक, कृषी सेविका शुभांगी निकाडे यांच्यासह वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी तसेच ओगदी सोसायटीचे चेअरमन रवींद्र पोळ विष्णुपंत कोल्हे, रामनाथ गोणटे, सदाशिव गोणटे, सुनील बोठे, प्रकाश कोल्हे, अजित बोठे, अतुल बोठे, बाळू कोल्हे, समाधान कोल्हे, ग्रामसेवक रफिक सय्यद, तलाठी कृष्णा आरसावे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.





