आपला जिल्हा

शिंगणापूर ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत

शिंगणापूर ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत
शिंगणापूर ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २९ ऑक्टोबर २०२५अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आज बुधवार दि २९ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयास भेटी दिल्या याच भेटीत त्यांनी तालुक्यातील शिंगणापूर गावाला देखील धावती भेट दिली असता या प्रसंगी शिंगणापूर गावच्या ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.

जाहिरात

या धावत्या भेटी प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यामवेत प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या सह वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी होते. तर शिंगणापूर गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ विजय काळे, उपसरपंच शाम संवत्सरकर, माजी पंचायत समिती सदस्य  कैलास संवत्सरकर, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय संवत्सरकर ग्रामपंचायत सदस्य प्रसाद आढाव तसेच ग्रामस्थ आढाव, छगन कारभारी संवत्सरकर, राजेंद्र कुर्हे  ग्राम विकास अधिकारी अविनाश पगारे आदी उपस्थितांनी जिल्हाधिकारी डॉ आशिया व त्यांचा समवेत असलेल्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले.

जाहिरात
या प्रसंगी सरपंच डॉ काळे यांनी गावात राबवत असलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती दिली तर शेतकऱ्यांना ईकेवायसी संबंधी येणाऱ्या अडचणीची माहिती दिली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे