आपला जिल्हा

जिल्हाधिकाऱ्यांची कोपरगाव औद्योगिक वसाहतीतील ताराचंद ऍग्रो ला भेट

जिल्हाधिकाऱ्यांची कोपरगाव औद्योगिक वसाहतीतील ताराचंद ऍग्रो ला भेट

जिल्हाधिकाऱ्यांची कोपरगाव औद्योगिक वसाहतीतील ताराचंद ऍग्रो ला भेट

कोपरगाव विजय कापसे दि २९ ऑक्टोबर २०२५अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया बुधवार दि २९ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयास भेटी दिल्या याच भेटीत त्यांनी कोपरगाव औद्योगिक वसाहत मध्ये सुरू असलेल्या ताराचंद ऍग्रो या कारखान्यास भेट देत माहिती जाणून घेतली.

जाहिरात

या प्रसंगी त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, मंडळ कृषी अधिकारी साईनाथ मलिक, प्रधानमंत्री सुषमा अन्नप्रक्रिया योजनेचे जिल्हा संसाधन अधिकारी राहुल घुले उपस्थित होते याप्रसंगी कंपनीचे सर्वेसर्वा सर्वेसर्वा शरद खरात यांनी जिल्हाधिकारी ड्रॉ पंकज आशिया यांचे स्वागत केले.

जाहिरात

महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत प्रधानमंत्री सुष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ताराचंद ऍग्रो नावाने सुरू असलेल्या हरभरा डाळ निर्मिती करणाऱ्या कंपनीस जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देत हरभरा डाळ निर्मितीची सर्व माहिती कंपनीचे सर्वेसर्वा शरद खरात यांच्याकडून जाणून घेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शासकीय योजनेचा लाभ घेत उद्योग क्षेत्रात पाऊल टाकल्याबद्दल खरात यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे