आपला जिल्हा

योगेश बागुल यांचा सुवर्ण समाज रत्न पुरस्काराने गौरव 

योगेश बागुल यांचा सुवर्ण समाज रत्न पुरस्काराने गौरव 

योगेश बागुल यांचा सुवर्ण समाज रत्न पुरस्काराने गौरव 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १२ ऑगस्ट २०२५- मराठवाडा अहिर सुवर्णकार शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने सुवर्ण सभागृह कम्युनिटी सेंटर प्लॉट सिडको संभाजीनगर येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते कोपरगाव येथील योगेश तुळशीदास बागुल यांना राज्यस्तरीय सुवर्ण समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

जाहिरात

योगेश तुळशीदास बागुल हे कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तर मुंबादेवी दत्तपार जिमखाना छत्रपती चौक शिवसेना शाखा कोपरगावचे संस्थापक असून त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक व धार्मिक कार्य केले आहे तर त्यांच्या नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात आपल्या वार्डात तसेच संपूर्ण कोपरगाव शहरात केलेली कामे वाखाण्याजोगी असून त्यांनी कोरोना महामारी मध्ये अनेक गरजू कुटुंबांना मास्क सॅनिटायझर आवश्यक त्या किराणा किटचे वाटप केले आहे.

जाहिरात
 योगेश बागुल हे नेहमी अडीअडचणीच्या काळात सर्वांना मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व असून सुवर्ण बांधवांच्या प्रत्येक आणि अडचणीसाठी ते नेहमी उभे असतात ते गेल्या २१ वर्षापासून मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा आयोजित करत असतात त्यांच्या याच सामाजिक धार्मिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय सुवर्ण समाज रत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव झाल्यानर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे