आपला जिल्हा

सोमैया विद्या मंदिर  साकरवाडीत रोबोटिक्सचे प्रशिक्षण

सोमैया विद्या मंदिर  साकरवाडीत रोबोटिक्सचे प्रशिक्षण

सोमैया विद्या मंदिर  साकरवाडीत रोबोटिक्सचे प्रशिक्षण

कोपरगाव विजय कापसे दि १० डिसेंबर २०२५साकरवाडीच्या मातीत १९४२ साली पद्मभूषण करमशी जेठाभाई सोमैया यांनी शिक्षणाचा पहिला दीप लावला होता. त्यातून जन्मलेल्या सोमैया विद्या मंदिराची परंपरा आज साधारण आठ दशके पार करूनही तेवढ्याच तेजाने उजळत आहे.

जाहिरात

या पवित्र वारशाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी मुंबईतील के. जे. सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एआई-रोबोटिक सेलने शाळेतील विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रोजेक्ट डिझाइनचे दोन दिवसीय प्रशिक्षण दिले. ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रज्ञानाची सहज पोहोच हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रशिक्षणासाठी गोदावरी बायो रिफायनरी लिमिटेडचे संचालक  सुहास गोडगे यांचे प्रोत्साहन, सोमैया आय टी कॉलेज चे प्राचार्य डॉ. विवेक सुन्नपवार यांचे मार्गदर्शन आणि मुख्याध्यापिका  सुनीता पारे यांचे सहकार्य लाभले. उपक्रमाची संकल्पना आणि समन्वय डॉ. वैशाली वाढे यांनी सांभाळला. त्यांच्या मते ग्रामीण शाळांमध्ये रोबोटिक्सचे प्रशिक्षण आणि त्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत चमकणारी नवी स्वप्ने, हीच पद्मभूषण करमशी सोमैया यांना खरी शैक्षणिक आदरांजली आहे.

जाहिरात

मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम विभागातील विद्यार्थी पुष्प मारू, केसा सय्यद, नव्या प्रभू, मंथन जंत्रे, अनंत जैस्वरा, अंशू मानिया आणि पल्लवी चावडा यांनी प्रशिक्षण देण्यास पुढाकार घेतला.

या उपक्रमामागे सोमैया विद्याविहार ट्रस्ट चे अध्यक्ष  समीर सोमैया यांची “ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक ज्ञानाच्या दाराशी नेण्याची” दृष्टी ठामपणे दिसून येते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे