आपला जिल्हा

रायतेवाडी येथे मा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्वागत कमानीचे लोकार्पण

रायतेवाडी येथे मा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्वागत कमानीचे लोकार्पण

स्वागत कमानी मुळे गावाच्या वैभवात भर माजी मंत्री बाळासाहेब थोरात

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि ६ नोव्हेंबर २०२५
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना नेहमी ऊस उत्पादक ,शेतकरी आणि सभासद यांचे हिताचे निर्णय घेत असून कारखान्यांने कायम विकास कामात योगदान दिले आहे . रायतेवाडी गावाने एकजुटीतून कायम विकासाला प्राधान्य दिले आहे .नवीन कमानीमुळे गावच्या वैभवात भर पडली असल्याचेप्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

     तालुक्यातील रायते या गावात आदिशक्ती मुक्ताई माता मंदिराजवळ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडून नागरिकांच्या आग्रहास्तव स्वागत कमान देण्यात आली. तिचे लोकार्पण माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व गावकरी यांच्या हस्ते झाले.यावेळी ते बोलत होते. यावेळी समवेत  एड. नानासाहेब शिंदे, रामहरी कातोरे, रमेश भाऊ गुंजाळ , बाळासाहेब राहणे ,संपत  खर्डे  , भाऊसाहेब खर्डे ,पांडुरंग नवले, महादू खर्डे ,नानासाहेब खर्डे, रमेश गफले, सुरज पानसरे ,सुदाम  खर्डे  , राहुल शिरतार ,शशिकांत कडलग ,सुरज  खर्डे  , कलीम पिरजडे, चेतन मेने आदी सह युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

   यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, रायतेवाडी गावात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने एक स्वागत कमान हवी अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून ग्रामस्थांची होती. नवरात्र उत्सवामध्ये आदिशक्ती मुक्ताई माता देवीचा कार्यक्रम येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

जाहिरात

भाविकांसाठी दररोज किर्तन भजन व शेवटी महाप्रसाद या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन नवरात्र कमिटी व युवकांच्या वतीने होत असते. ही गावची धार्मिक बाब कौतुकास्पद आहे. थोरात कारखान्याने तालुक्याच्या विकासात कायम महत्त्वाची भूमिका मांडली आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत कारखाना नेहमीच करत असतो. नवीन स्वागत कमानीमुळे गावच्या वैभवात भर पडली असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे