आपला जिल्हा

आत्मा मालिक चे तुषार कापसे बेस्ट प्रिन्सिपल तर मनीषा शिंदे बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मानित

आत्मा मालिक चे तुषार कापसे बेस्ट प्रिन्सिपल तर मनीषा शिंदे बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मानित

आत्मा मालिक चे तुषार कापसे बेस्ट प्रिन्सिपल तर मनीषा शिंदे बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मानित

जाहिरात

येवला विजय कापसे दि ८ नोव्हेंबर २०२५-आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल येवल्याचे प्राचार्य तुषार कापसे यांना नुकताच इंडियन टॅलेंट ओलंपियाड ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पहिल्या महिला आयपीएस अधिकारी तथा पॉंडेचेरीच्या राज्यपाल डॉ. किरण बेदी व भारताच्या उत्कृष्ट बॅडमिंटनपटू पद्मभूषण सायना नेवाल यांच्या हस्ते राज्यस्तरीय बेस्ट प्रिन्सिपल या पुरस्काराने तर इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका मनीषा शिंदे यांना बेस्ट टीचर या पुरस्काराने गौरवण्यात आल्याने आत्म मालिक इंग्लिश मीडियम स्कूल येवला गुरुकुलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जाहिरात
इंडियन टॅलेंट ओलंपियाड ऑर्गनायझेशन ही देशातील नंबर एकची ओलंपियाड स्पर्धा परीक्षा घेणारी संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून मागील वर्षी देशातील जवळपास दीड लाख शाळेतील ४९ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत  आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल येवला येथील शाळेच्या १२५ विद्यार्थ्यांनी

जाहिरात

आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादाने तसेच संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस तथा येवला गुरुकुलचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेत गोल्ड, सिल्वर, ब्रांच मेडल मिळवत घवघवीत यश मिळवत शाळेला गोल्डन स्कूल, प्राचार्यांना बेस्ट प्रिन्सिपल तर शिक्षिकेस बेस्ट टीचर अवॉर्ड मिळून दिले आहे.

जाहिरात
शाळेला मिळालेल्या गोल्डन स्कूल पुरस्काराबद्दल तसेच प्राचार्य तुषार कापसे यांना बेस्ट प्रिन्सिपल व शिक्षिका मनिषा शिंदे यांना बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे, उपाध्यक्ष हेमंत शहा, सचिव राजेश पाटील आदीं सर्व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी,पालक आदींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्राचार्य तुषार कापसे
शिक्षिका मनीषा शिंदे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे