अमृतवाहिनीचा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूर सोबत करार – शरयू देशमुख
एमबीए अभ्यासक्रमास जागतिक दर्जाची जोड
जाहिरात
संगमनेर प्रतिनिधी दि १९ नोव्हेंबर २०२५-अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाने नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आय. आय. एम.) या व्यवस्थापन शास्त्राच्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला. या संस्थेचा कॅनडा येथील आयव्हीइवाय या व्यवस्थापन संस्थेसोबत करार आहे. या करारामुळे अमृतवाहिनी संस्थेच्या एमबीएच्या शिक्षणाला जागतिक जोड मिळाली आहे. तसेच बिजनेस च्या संदर्भातील केस स्टडी येथील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अवगत होतील.
जाहिरात
याबाबत माहिती देताना अमृतवाहिनी संस्थेच्या कार्यकारी संचालिका देशमुख म्हणाल्या कि, एमबीएच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने हा करार करण्यात आला आहे. त्यामुळे अमृतवाहिनी संस्थेच्या दृष्टीने या कराराला वेगळे महत्त्व आहे. या करारामुळे कॅनडा येथील आयव्हीड़वाय पब्लिशिंग केस स्टडी प्रसिद्ध करून त्या एमबीएच्या विद्यार्थ्यांना शिकविता येणे शक्य होईल. या करारामुळे जागतिक मानांकनावर आधारित शिक्षण थेट अमृतवाहिनीत पोहोचणार आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना विश्लेषण निर्णय क्षमता आणि जागतिक समस्या सोडविण्याचा दृष्टिकोन अवगत होईल.जाहिरात
आय.आय.एम. नागपूर यांनी आयव्हीईवाय पब्लिशिंग कॅनडा या संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच केस रिसर्च सेंटरचे उद्घाटन नागपूर येथे सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी झाले. यामध्ये भारतीय उद्योग जगतावर आधारित केस स्टडी असतील. त्यात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या अमृतवाहिनी संस्थेतर्फे एमबीए महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे तर आयआयएम कडून संचालक डॉ. भीमराव मैत्री, केश रिसर्च सेंटरचे डॉ. राकेश गुप्ता उत्पादन आणि प्रसारण संचालिका व्हायोलेट गलाधर आदी उपस्थित होते.
जाहिरात
या आयआयएम नागपूर व आयव्हीईवाय पब्लिशिंग कॅनडा यांच्याशी अमृतवाहिनीचा हा सामंजस्य करार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त भारतीय उद्योग जगतातील माहितीचा स्रोत ठरणार आहे असे गौरव उदगार अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी काढले. या आगतिक स्तरावरील कराराबद्दल अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ट्रस्टी तसेच एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. जयश्री थोरात. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात. संस्थेचे मुख्य कार्यकारी अनिल शिंदे, संस्थेचे मॅनेजर व्ही. बी. धुमाळ संस्थेचे अकेडेमिक डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव या सर्वांनी अभिनंदन केले.
अमृतवाहिनी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे जगातील प्रगत देशातील अभ्यासक्रमाबाबत माहिती व्हावी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात जगात नेमके काय बदल होत आहेत याची जाणीव व्हावी असा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आयआयएम या संस्थेसोबत परस्पर सामंजस्य करार हा त्याचाच एक भाग आहे.
शरयू देशमुख, कार्यकारी संचालिका, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था, संगमनेर