सुप्रसाध मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मोफत होणार लिथोट्रिप्सी पद्धतीने मुतखड्याच्या रुग्णांवर उपचार
सुप्रसाध मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मोफत होणार लिथोट्रिप्सी पद्धतीने मुतखड्याच्या रुग्णांवर उपचार
सुप्रसाध मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मोफत होणार लिथोट्रिप्सी पद्धतीने मुतखड्याच्या रुग्णांवर उपचार

कोपरगाव विजय कापसे दि २१ जानेवारी २०२५–कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील डॉ. कोळपे नॉलेज सिटीच्या सुप्रसाध मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आता मोफत होणार लिथोट्रिप्सी पद्धतीने मुतखड्याच्या रुग्णांवर उपचार होणार असून याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. कोळपे नॉलेज सिटीचे संस्थापक डॉ. प्रकाश कोळपे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यासह जवळपास परीसरातील रुग्णांना मुतखड्यावर शस्त्रक्रिया व त्यावर महागडे उपचार असल्याने रूग्णांना उपचार घेणे परवडत नसल्याचे निदर्शनास आल्याने तसेच इतर सर्व समस्या लक्षात घेऊन सुप्रसाध मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत लिथोट्रिप्सी पद्धतीने आता रुग्णांवर विना शस्त्रक्रिया आधुनिक पद्धतीने उपचार करणे शक्य होईल. रुग्णांच्या वेदना कमी करून त्यांना कमीत कमी वेळेत चांगल्या सुविधा देण्यासाठी डॉ. प्रकाश कोळपे सर सदैव अग्रेसर असतात.

अत्याधुनिक सुविधा रुग्णांसाठी निश्चितच आशेचा किरण ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली. लिथोट्रीप्सी पद्धती विषयी मेडिकल डायरेक्टर डॉ. पितांबरे सर म्हणाले की, या यंत्राद्वारे कंपन पद्धतीने मुतखड्यावर प्रक्रिया केली जाते त्यामुळे रुग्णांना कोणत्याही प्रकारची इजा, किंवा जखम होत नाही तसेच कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज भासत नाही

हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मेडिसीन, जनरल सर्जरी, मेंदू व मनके संबंधित विविध आजार, स्त्री रोग, नेत्र रोग, हाडांचे आजार, मुत्र रोग, या व इतर विविध आजारांवर पाच लाखापर्यंत मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. वेळोवेळी रुग्णालयात उपलब्ध होणाऱ्या नवनवीन आधुनिक उपचार पद्धतीचा कोळपेवाडी गावांसह कोपरगाव तालुक्यातील तसेच जवळपास परिसरातील गरीब व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रकाश कोळपे व डॉ. धनंजय कोळपे तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र निकम यांनी केले.

मंगळवार दि. २१ जानेवारी २०२५ रोजी लिथोट्रिप्सी मशिनचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी डॉ. प्रकाश कोळपे, डॉ. धनंजय कोळपे संचालक, डॉ. यशोधन पितांबरे मेडिकल डायरेक्टर, डॉ. प्रदीपकुमार जोंधळे, हरीश झिरपे व रविंद्र निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह डॉक्टर, अधिकारी , कर्मचारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



