शुक्रवारी संगमनेर खुर्द येथे अमृतवाहिनी बँकेच्या नवीन शाखेचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांची उपस्थिती

संगमनेर प्रतिनिधी दि २७ नोव्हेंबर २०२५- संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कामधेनू असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेने नुकताच 1100 कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार केला असून या बँकेच्या संगमनेर खुर्द येथील नवीन शाखेच्या इमारतीचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा शेतकी संघाच्या पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात,मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी दिली आहे.

संगमनेर खुर्द येथील शेतकरी मेळावा व बँकेच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने सर्व अत्याधुनिक प्रणालींचा वापर केला असून नुकताच 1100 कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. सभासद,शेतकरी,कर्जदार व तालुक्यातील नागरिक यांचा बँकेवर मोठा विश्वास असून बँकेचे कामकाज हे कायम चांगले राहिले आहे.

संगमनेर खुर्द येथे बँकेची अद्यावत इमारत होणार असून या इमारतीचा भूमिपूजन व ग्राहक शेतकरी मेळावा शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता संगमनेर खुर्द शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी होणार आहे. यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात,मा.आ.डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात,ॲड.माधवराव कानवडे, सौ. दुर्गाताई तांबे, बाजीराव पाटील खेमनर,रणजीतसिंह देशमुख,लहान भाऊ पाटील गुंजाळ,लक्ष्मणराव कुटे, पांडुरंग पाटील घुले,इंद्रजीत भाऊ थोरात,शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, प्रतापराव ओहोळ, हौशीराम सोनवणे,आर.बी.राहणे, शरद नाना थोरात, गणपतराव सांगळे,रामहरी कातोरे,रमेश गुंजाळ, नबाजी पाटील गुंजाळ,अजय फटांगरे, के.के.थोरात,मधुकर गुंजाळ,अर्चना बालोडे,रावसाहेब गुंजाळ, रमेश सुपेकर, कैलास पानसरे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी संगमनेर खुर्द व परिसरातील नागरिक महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड नानासाहेब शिंदे सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांनी केले आहे.



