आपला जिल्हा

डॉक्टर घायतडकर यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ४७० हुन अधिकच्या गरजूंनी घेतला लाभ

डॉक्टर घायतडकर यांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ४७० हुन अधिकच्या गरजूंनी घेतला लाभ
कोळपेवाडीच्या सुप्रसाध हॉस्पिटलचे मोठे सहकार्य
जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि ११ जानेवारी २०२५नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कोपरगाव येथील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. कुणाल अशोकराव घायतडकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या महाआरोग्य तपासणी निदान उपचार शिबिरास उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला असून डॉ घायतडकर यांनी आयोजित केलेल्या या अभिनव उपक्रमाचे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात

डॉ.कुणाल घायतडकर  यांचा गुरुवार दिनांक ९ जानेवारी रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त स्व. अशोकराव घायतडकर सेवाभावी संस्था, सुरेखाताई प्रकाश कोळपे आयुर्वेद महाविद्यालय व सुप्रसाध मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोळपेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरातील शारदा नगर येथे मोफत हाडांच्या, डोळ्यांचा, दातांच्या सर्व आजारावर उपचार, जनरल सर्जरी आधी आजारांची तपासणी कोळपे नॉलेज सिटीचे सर्वेसर्वा डॉ.प्रकाश कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक डॉ. धनंजय कोळपे यांच्या नेतृत्वाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वेगवेगळ्या आजाराच्या ४७० हून अधिकच्या  गरजूनी लाभ घेतला आहे.

जाहिरात

सदर शिबिर यशस्वीतेसाठी डॉ. घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटलचे डॉ. कुणाल घायतडरकर, डॉ.भाग्यश्री घायतडकर, सुप्रसाध हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ.यशोधन पितांबरे,जनसंपर्क अधिकारी,शहनवाज शहा, मार्केटिंग मॅनेजर विक्रम खटकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र निकम, वैद्यकीय अधिकारी डॉ.हिना शेख, नर्सिंग विभाग प्रमुख योगिता आयनोर, दिग्विजय शेळके, अभि आंबोरे आदी सह सुप्रसाध हॉस्पिटल, डॉ घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटलचे कर्मचारी अधिकारी तसेच डॉ कुणाल घायतडकर मित्रपरिवार यांनी अथक परिश्रम घेतले आहे.

जाहिरात
या शिबिरात ५० हुन अधिकच्या गरजु रुग्णांना पुढील उपाचारासाठी कोळपेवाडी येथील सुप्रसाध हॉस्पिटलमध्ये  उपचार तपासणी करण्यात आली असुन यातील अनेक रुग्णांनी हॉस्पिटलच्या कार्यतत्परतेचे व सोयी सुविधाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.
या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांच्या सह अनेक मान्यवरांनी डॉ कुणाल घायतडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा या उपक्रमाचे कौतुक केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे