आपला जिल्हा

श्री साई सेवा प्रतिष्ठान तर्फे श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन

श्री साई सेवा प्रतिष्ठान तर्फे श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन
श्री साई सेवा प्रतिष्ठान तर्फे श्री दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन
कोपरगाव  विजय कापसे दि २ डिसेंबर २०२५हिंदू धर्मात श्री दत्त जयंती सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने सबंध देशभर मोठ्या उत्साहात श्री दत्त जयंती सोहळा साजरा केला जात असतो याही वर्षी गुरुवार दि ४ डिसेंबर २०२५ रोजी कोपरगावात मोठ्या उत्साहात श्री दत्त जयंती सोहळा साजरा केला जाणार आहे.
 सविस्तर वृत्त असे की, नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय असलेले श्री साई सेवा प्रतिष्ठान कोपरगाव यांच्यातर्फे गुरुवार ४ डिसेंबर रोजी श्री साईबाबा तपोभूमी मंदिर साईबाबा कॉर्नर कोपरगाव येथे श्री साईबाबा तपोभूमी मंदिर समिती कोपरगाव यांच्या विशेष सहकार्यातून श्री दत्त जयंती उत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे.याप्रसंगी वडगाव बल्ले तालुका येवला येथील ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या भागवताचार्य ह.भ.प सुवर्णामाई जमधडे यांचे ठीक सायंकाळी ६ वाजता जाहीर कीर्तन होणार आहे. तर तदनंतर भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचा कार्यक्रम होणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित  राहत श्री दत्त जयंती सोहळा कार्यक्रम व महाप्रसादाचा भंडाऱ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साई सेवा प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे