आपला जिल्हा

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

अमृत सांस्कृतिक मंडळाच्या पुढाकारातून कारखाना कार्यस्थळावर विविध स्पर्धा

संगमनेर विजय कापसे दि ३ फेब्रुवारी २०२६काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी  ते 7 फेब्रुवारी 2026 रोजी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अमृत संस्कृतिक मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली आहे.

जाहिरात

याबाबत अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस संगमनेर तालुक्यामध्ये स्फूर्ती दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 7 फेब्रुवारी रोजी संपूर्ण संगमनेर तालुक्यात आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर,विविध क्रीडा स्पर्धा, स्वच्छता अभियान, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच बरोबर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचलित अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर विविध स्पर्धा होणार आहेत.

जाहिरात

यामध्ये क्रिकेट, खो – खो, बॅडमिंटन, हॉलीबॉल व कबड्डी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कबड्डीचे सामने सोसायटी समोरील मैदानावर होणार असून मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांच्या हस्ते या सामन्यांचा शुभारंभ होणार आहे तर बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी माध्यमिक विद्या भवनच्या मैदानावर मा.आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या उपस्थिती मध्ये सकाळी 9 वाजता खो – खो च्या स्पर्धांची सुरुवात होणार आहे. गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये बॅडमिंटन हॉल येथे बॅडमिंटनच्या स्पर्धा सुरू होणार असून शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी 9 वाजता आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर हॉलीबॉल चे सामने होणार आहे. तर शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2020 रोजी इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 9 वाजता अमृतेश्वर मंदिरासमोरील प्रांगणामध्ये क्रिकेटच्या सामन्यांचा शुभारंभ होणार आहे. याचबरोबर ना.बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

या विविध स्पर्धांमध्ये विविध संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांसाठी क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अमृत संस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात
मा आ बाळासाहेब थोरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे