स्वामी सेवा भक्ती मार्गातील ठेवा – विवेकभैय्या कोल्हे

स्वामी सेवा भक्ती मार्गातील ठेवा – विवेकभैय्या कोल्हे
स्वामी सेवा भक्ती मार्गातील ठेवा – विवेकभैय्या कोल्हे

कोपरगांव विजय कापसे दि २५ डिसेंबर २०२५–दिंडोरी प्रणित प.पू. मोरेदादा, गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी लहानापासून मोठ्यापर्यंत स्वामीसेवेची शिकवण दिली. स्वामी सेवा भक्ती मार्गातील ठेवा आहे असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. संजीवनी उद्योग समूहाच्या संकटकाळात स्वामी सेवेने मोठा आधार दिला. कार्यस्थळावरील प्रत्येक आध्यात्मिक कार्यासाठी प्रशस्त हॉल लवकरच बांधला जाईल असेही ते म्हणाले.

संजीवनी कार्यस्थळावर दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता शुक्रवारी विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यांत आली त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक सुहास यादव होते.
प्रारंभी चंद्रकांत जाधव यांनी प्रास्तविकांत १९ वर्षात प्रत्येकी दोन वेळेस अशी ३८ गुरुचरित्र पारायणे, स्वामी सेवेत नवनाथ, मल्हारी सप्तशती, दुर्गा सप्तशती, भागवत, गायत्री मंत्र, रामरक्षा, मारुती स्तोत्रसह अन्य पारायणांतील एकूण सेवेचा उल्लेख केला. कुमारी ईश्वरी चव्हाण हिने दत्तजन्मानिमीत्त काढलेल्या सर्वांगसुंदर रांगोळी बद्दल तीचा व अन्य सहकाऱ्यांचा विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.

विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी २००६ मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठबळातून ही सेवा अखंड सुरु असून त्यात महिलांचा सर्वाधिक सहभाग असतो त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. कार्यस्थळावर बजरंगबलीचे अराध्यदैवत आहे. त्याठिकाणी विविध धार्मिक, अध्यात्मीक पारायणे, स्वाध्याय, अखंड हरीनाम सप्ताह सुरु असतो त्यासाठी लवकरच तेथे सुसज्ज हॉल उभारला जाईल असे सांगुन त्यांनी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकलेले व आमच्या संस्थांचे सल्लागार डॉ. शांतम शुक्ला (प्रयागराज) हे या आराध्यदैवताची दर शनिवारी न चुकता सेवा करतात याचा उल्लेख करत श्री साईबाबा संख्यानचे जनसंपर्क अधिकारी स्व. मोहन यादव यांच्या सेवेच्या आठवणींना उजाळा देत मनुष्याला दैनंदिन जीवनांत अनेक संकटांना तोंड द्यावे लागते अशावेळी सामुदायीक सेवा त्याची तीव्रता कमी करून त्यात यश देत असते, तेंव्हा प्रत्येकांना या सामुदायीक सेवेत सहभाग नोंदवावा असे आवाहन विवेक भैय्या कोल्हे यांनी शेवटी केले.
याप्रसंगी संचालक रमेश घोडेराव व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, अश्विनी विभागाचे प्रमुख आर. जे. जंगले, मुख्य शेतकी अधिकारी एन.डी. चौधरी, संरक्षणअधिकारी रमेश डांगे, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी, स्वामी सेवेकरी मोठ्या संख्येने हजार होते. शेवटी चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले. उपस्थीत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यांत आले.




